Breking News
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्णएआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ; दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर‘स्वप्नसुंदरी मी भारताची २०२६’ : पुण्यात सौंदर्य स्पर्धेचे आयोजननगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावीविधिमंडळात विद्यार्थ्यांची अभ्यासक भेट; डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संवाद ठरला आकर्षणरोजगाराच्या नावाखालील फसवणुकीपासून सावध रहा अण्णासाहेब पाटील महामंडळाची कर्ज व्याज परतावा योजना अधिक सुलभबारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची द्वितीय यादृच्छिकीकरण प्रक्रिया पूर्णमुख्यमंत्री रोजगार योजनेतून स्वावलंबन; इतरांनाही दिली रोजगाराची संधीराम नदीच्या ऐतिहासिक तथ्यांचा अभ्यास व्हावा-प्रा. देवेंद्र देशपांडे

पुण्यात रविवार पेठेत महिलेच्या पिशवीतून रोकड चोरी

ट्रॅकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, पुण्यातील हडपसरमधील घटना

चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन ४२ हजारांची रोकड चोरली

marathinews24.com

पुणे – खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी ४२ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना रविवार पेठेत घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसरमधील सराफी पेढीतून ९८ लाखाांचे दागिने चोरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे परिसरात राहायला आहेत. त्या रविवार पेठेतील कापडगंज परिसरात साेमवारी (३० मार्च) दुपारी खरेदीसाठी आल्या होत्या. चोरट्यांनी गर्दीत त्यांच्या पिशवीतून ४२ हजारांची रोकड चोरून नेली. रोकड चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी कापडगंज परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस हवालदार शिंदे तपास करत आहेत. आठवड्यापूर्वी तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून दीड लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×