हडपसरमधील सराफी पेढीतून ९८ लाखाांचे दागिने चोरी

हडपसरमधील सराफी पेढीतून ९८ लाखाांचे दागिने चोरी

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसर परिसरातील एका सराफी पेढीतून चोरट्यांनी ९८ लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका सराफ व्यावसायिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कौटुंबिक वादातून मारहाण केल्यामुळे पत्नीचा गर्भपात – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सराफ व्यावसायिक हे सदाशिव पेठेतील विजयानगर काॅलनीत राहायला आहेत. हडपसरमधील मगर आळीत त्यांची सराफी पेढी आहे. सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी सराफी पेढीचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. सराफी पेढीत चार चोरटे शिरले. चोरट्यांनी सराफी पेढीतून सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसंनी सराफी पेढीतील चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक फिरोज मुलाणी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×