Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune Crime News : दिवाळीत पैसे वाटप करण्याची बतावणी; ज्येष्ठ महिलेचे दागिने लंपास

Beed Theft News

रविवार पेठेतील गोविंद हलवाई चौकात चोरट्यांचा डाव; तीन अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Pune Crime News : दिवाळीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांना पैसे वाटप करण्यात येत असल्याची बतावणी करुन चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेकडील दीड लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या लांबविल्याची घटना रविवार पेठेतील गोविंद हलवाई चौक परिसरात घडली. या प्रकरणी तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फॉरेक्स, क्रिप्टोच्या आमिषाने १४ कोटी ७० लाखांचा गंडा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६५ वर्षीय ज्येष्ठ महिला शुक्रवार पेठेतील नेहरु चौक भागात राहायला आहेत. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) सकाळी अकराच्या सुमारास त्या गोविंद हलवाई चौक परिसरात खरेदीसाठी आल्या होत्या. या भागात खरेदीसाठी गर्दी झाली होती. त्या वेळी तीन चोरट्यांनी त्यांना अडवले. ‘दिवाळीनिमित्त गरजू ज्येष्ठ महिलांना पैसे वाटप करण्यात येत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. तुमच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून ठेवा’, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला बोलण्यात गुंतविले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी चोरट्यांनी साधली. महिलेच्या हातातील दीड लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या लांबवून चोरटे पसार झाले.

चोरटे पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी गोविंद हलवाई चौक परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे तपास करत आहेत.
चार दिवसांपूर्वी धनकवडी भागात बतावणी करुन ज्येष्ठ नागरिकाला लुटण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर मुकुंदनगर, तसेच रविवार पेठेत ज्येष्ठ नागरिकांकडे बतावणी करुन त्यांच्याकडील दागिने लुटण्याची घटना घडली.

धान्य, कपडे वाटप करण्याची बतावणी करुन ज्येष्ठांकडील दागिने लांबविण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत वाढ झाली असून, चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करावे. बतावणी करणारे चोरटे आढळून आल्यास त्वरीत पोलिसांकडे तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×