Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune Crime News : फ्लॅटचे कुलूप तोडून साडेसात लाखांचा ऐवज चोरी

Pune Crime News

चोरट्यांविरुद्ध लोहगाव पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे  – फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ७ लाख ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना लोहगावमधील संतनगर भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध लोहगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका तरुणाने फिर्याद दिली आहे.

डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आणि त्याचे कुटुंबीय लोहगावमधील संतनगर भागात असलेल्या मैत्री पार्क सोसायटीत राहायला आहेत. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) सकाळी तरुण आणि त्याचे कुटुंबीय सदनिका बंद करुन कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी सात लाख ६४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे तपास करत आहेत.

मंडईत महिलेचे दागिने हिसकाविणारा चोरटा अटकेत

महात्मा फुले मंडई परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील ७० हजारांची सोनसाखळी हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. फैजल नौशाद मोमीन (वय २७, रा. गॅलेक्सी अपार्टमेंट, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी भागात राहायला आहेत. त्या दिवाळीनिमित्त शनिवारी (३१ ऑक्टोबर) दुपारी महात्मा फुले मंडई परिसरात खरेदीसाठी आल्या हाेत्या. मंडईतील वाहनतळाजवळ शोभेच्या वस्तू विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटली आहेत. दुपारी अडीचच्या सुमारास खरेदी करताना महिलेच्या गळ्यातील ७० हजारांचे सोन्याचे दागिने आरोपी मोमीन याने हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. गर्दीत पसार होण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस हवालदार नाकाडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×