Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune Cyber Fraud : पुण्यात ८० वर्षांच्या जेष्ठाला हाव नडली, १९ लाखांचा गंडा

Share Trading Scam Pune

समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Pune Cyber Fraud : हव्यासापोटी अनेकांना सायबर चोरट्यांनी जाळ्यात ओढून लाखो रूपयांचा गंडा घातला आहे. दरदिवशी अशा घटनांमध्ये वाढ होत असतानाही नागरिकांमध्ये जनजागृती होत नसल्याचे दिसून आले आहे. विविध आमिष, गुंतवणूकीच्या नावाखाली उच्च शिक्षितपासून जेष्ठ नागरिक सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अलगदरित्या अडकत चालले आहेत. अशीच एक घटना सोमवार पेठेत घडली असून, क्वान्टम एआय शेअर बाजारातील गुंतवणूकीच्या आमिषाने ८० वर्षीय जेष्ठाने १९ लाख रुपये गमावले आहेत.

ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी करुन सोन्याची अंगठी चोरली – सविस्तर बातमी 

गुंतवणूकीचा चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी जेष्ठाला तब्बल १९ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ९ ते ३१ जुलै कालावधीत घडली आहे. याप्रकरणी ८० वर्षीय नागरिकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, विविध बँकखातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे सोमवार पेठेत राहायला असून, ९ जुलैला सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. (Pune Cyber Fraud) क्वान्टम एआय शेअर बाजारात गुंतवणूकीवर चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष त्यांना दाखवण्यात आले. त्यानुसार अवघ्या २१ दिवसांत तक्रारदाराने १९ लाख रुपये संबंधितांच्या बँक खात्यात वर्ग केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जेष्ठाने पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक चेतन मोरे तपास करीत आहेत.

भिक्षेकर्‍याने केला तरुणावर वार, आरोपीला अटक

मला भूक लागल्याचे म्हणत तरुणाकडे भिक्षेकर्‍याने मागणी केली. त्यानंतर त्यांचा खिसा तपासायला सुरुवात केल्यामुळे तक्रारदाराने विरोध केला. त्याचा राग आल्यामुळे संबंधिताने तरुणावर लोखंडी हत्याराने वार करुन गंभीररित्या जखमी केले आहे. ही घटना २६ ऑक्टोबरला संध्याकाळी चारच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरात घडली आहे. याप्रकरणी हल्लेखोराला अटक केली आहे.

अबुबकर अब्दुलरेहमान सिद्धी (वय ३२ रा. खालापूर, राजगड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भवानी पेठेत राहणार्‍या ३८ वर्षीय तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदार हे २६ ऑक्टोबरला चार वाजण्याच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरात गेले होते. त्यावेळी झाडाखाली बसलेल्या एकाने त्यांच्याजवळ येउन मला भूक लागली आहे, काहीतरी दे असे म्हणत खिसे तपासायला सुरुवात केली. त्यामुळे तक्रारदाराने विरोध केला असता, आरोपी अबुबकर याने जवळील लोखंडी हत्याराने त्यांच्यावर वार करुन जखमी केले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×