Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune Cyber Fraud Cases : देवस्थानच्या नावे बनावट संकेतस्थळ

Pune Ladki Bahin Scheme Fraud

सायबर चोरट्यांकडून ११ लाखांचा गंडा

marathinews24.com

पुणे – Pune Cyber Fraud Cases : प्रसिद्ध देवस्थानच्या नावे बनावट संकेतस्थळ तयार करुन सायबर चोरट्यांनी भाविकाची ११ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध लोहगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे.

शिवाजीनगर न्यायालयात बेकायदा जमाव जमवून गोंधळ – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला, तिचे पती सहकुटुंब दिवाळीच्या सुट्टीत मध्य प्रदेशातील एका प्रसिद्ध देवस्थानात दर्शनासाठी निघाले होते. त्याअनुषंगाने ते देवस्थानच्या संकेतस्थळाची पाहणी करत होते. देवस्थानची पाहणी करताना त्यांनी महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध देवस्थानचे संकेतस्थळ उघडले. देवस्थानकडून ग्राहकांना निवास सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. विनामूल्य निवास सुविधेसाठी नावनोंदणी करण्यासाठी त्यांनी संकेतस्थळाच्या माध्यमातून पाहणी केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. नोंदणीसाठी काही शुल्क जमा करावे लागेल, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले.

चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन बँक खात्यातून ११ लाख २३ हजार रुपये काढून घेतले. ही रक्कम दुसऱ्या एका खात्यात वळविण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. चौकशीत सायबर चोरट्यांनी देवस्थानच्या नावे बनावट संकेतस्थळ तयार केल्याचे उघडकीस आले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राकेश कदम तपास करत आहेत.

‘लाईफ सर्टिफिकेट’च्या नावे ज्येष्ठाला १३ लाखांचा गंडा

बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना लाईफ सर्टिफिकेट देण्यात येणार असल्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी बँक खात्यातून १३ लाख रुपये लांबविले. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे हडपसरमधील काळेपडळ परिसरात राहायला आहेत. २६ ऑक्टोबर रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. एका राष्ट्रीयकृत बँकेतील प्रतिनिधी असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. Pune Cyber Fraud Cases ज्येष्ठांना लाईफ सर्टिफिकेट देण्यात येणार असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. चोरट्यांनी त्याना एक एपीके फाईल पाठविली. बँकेच्या नावे चोरट्यांनी बनावट उपयोजन (ॲप) तयार केले. या माध्यमातून चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्याची माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी खात्यातून १३ लाख रुपयांची रोकड लांबविली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×