Breking News
उत्सवांचे पावित्र्य जपत ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण गरजेचे- रोहित टिळकपुण्यात दहीहंडी पाहणे महागात, तरुणांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन चोरीलाएसटीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, मित्र जखमीगौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरणातील सरकारी पक्षाची अनुपस्थिती गंभीर : डॉ. नीलम गोऱ्हेमहाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला बेड्याशाडू मातीपासून चिमुकल्यांनी साकारला पर्यावरणपूरक बाप्पाशंतनू गोखले यांच्या संतूरवादनाने रसिक मंत्रमुग्धकात्रजमधील मंदिरातून ५ लाखांचे दागिने चोरीससून रुग्णालयाजवळ तरुणाला चाकूच्या धाकाने लुटलेआवाज बंद कर डीजे, तुला पुणेकरांची शपथ हाय’

पुण्यात दहीहंडी पाहणे महागात, तरुणांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन चोरीला

पुण्यात दहीहंडी पाहणे महागात, तरुणांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन चोरीला

शनिवार वाड्याजवळ दहीहंडीच्या गर्दीत घडली घटना

marathinews24.com

पुणे – दहीहंडीचा उत्सव पाहण्यासाठी मध्यवर्ती शनिवार वाड्याजवळ आलेल्या दोघा तरुणांना महागात पडले आहे. गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन चोरुन नेल्या आहेत. ही घटना ५ सप्टेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास शनिवार वाड्याजवळ घडली आहे. याप्रकरणी धानोरीत राहणार्‍या तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, मित्र जखमी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आणि साक्षीदार हे ५ सप्टेंबरला दहीहंडीचा उत्सव पाहण्यासाठी मध्यवर्ती भागात आले होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी तक्रारदाराच्या गळ्यातील ४० हजारांची सोन्याची चैन चोरुन नेली. त्यानंतर चोरट्यांनी दुसर्‍या तरुणाच्या गळ्यातील ६० हजारांची चैन हिसकावून नेली. काही वेळानंतर दोघांनाही गळ्यात सोन्याची चैन दिसून आली नाही. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस अमलदार निकम तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×