एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, मित्र जखमी

Dive Ghat ST Bus Accident

दिवे घाटातील अपघात

marathinews24.com

पुणे – भरधाव एसटी चालकाने समोरुन धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार तरुण ठार झाला असून, त्याचा मित्र गंभीररित्या जखमी झाला आहे. हा अपघात ५ सप्टेंबरला रात्री सव्वा आठच्या सुमारास दिवे घाटाच्या मध्यभागी घडला आहे. अपघातग्रस्त तरुणांना मदत न करता एसटी चालक पसार झाला आहे. याप्रकरणी त्याच्याविरूद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला बेड्या – सविस्तर बातमी 

गौरव राजेंद्र चव्हाण (वय २३ रा. बारामती )असे ठार झालेल्याचे नाव आहे. ऋषीकेश आबा खरात (वय २३, रा. बारामती ) असे जखमीचे नाव असून, त्याने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार एसटी महामंडळाच्या बसवरील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार गौरव आणि ऋषीकेश हे ५ सप्टेंबरला रात्री आठच्या सुमारास दिवे घाटातून बारामतीच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी भरधाव वेगाने समोरून आलेल्या एसटी चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दोघेही रस्त्यात पडून गंभीररित्या जखमी झाले. अपघातनंतर जखमींना मदत न करता एसटी चालक घटनास्थळाहून पसार झाला. दरम्यान, अपघात गौरव चव्हाण याचा मृत्यू झाला. तर ऋषीकेश खरात गंभीररित्या जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×