महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला बेड्या

Pune Rural Police Burglary Case

२५ लाखांचा ऐवज जप्त, पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – घरफोडी करणार्‍या सराईताला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेसह शिक्रापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून १६ तोळे दागिने, दुचाकी असा मिळून २४ लाख ३० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. दीपक भीमराव दांडगे (वय २५ रा. घुग्री, ता. भैसदेही सध्या रा. कविठा, आचलपूर, अमरावती ) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. यापुर्वी त्याच्याविरूद्ध महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात तब्बल १४ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

कात्रजमधील मंदिरातून ५ लाखांचे दागिने चोरी – सविस्तर बातमी 

शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची घटना घडली होती. त्यापार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांकडून चोरट्याचा शोध घेतला जात होता. पोलिसांनी पोलिसांनी घटनास्थळापासून रस्त्यालगत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, तांत्रिक विश्लेषण द्वारे आरोपीचा पत्ता शोधण्यात आला. संबंधित चोरटा आचलपूरमधील कविठामधील असल्याचे स्पष्ट झाले. तो बहिणीकडे राहत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेसह शिक्रापुर पोलिसांचे पथक आचलपूरला रवाना झाले. त्यानंतर सापळा रचून पथकाने दीपक दांडगे याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपी दांडगेने चोरी केल्याची कबुली दिली. त्याने शिक्रापूरमध्ये दोन, शिरुरमध्ये एकाठिकाणी घरफोडी केल्याचे सांगितले. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १६ तोळे दागिने, दुचाकी असा २४ लाखांवर मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय अधिकारी रवींद्र भोसले, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, एपीआय राहूल देशमुख, उपनिरीक्षक महेश डोंगरे, उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, संजय पडयाळ, तुषार पंदारे, जर्नादन शेळके, संजू जाधव, विकास पाटील, सागर धुमाळ यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×