Breking News
शंतनू गोखले यांच्या संतूरवादनाने रसिक मंत्रमुग्धकात्रजमधील मंदिरातून ५ लाखांचे दागिने चोरीससून रुग्णालयाजवळ तरुणाला चाकूच्या धाकाने लुटलेआवाज बंद कर डीजे, तुला पुणेकरांची शपथ हाय’हातउसने पैसे परत करण्याची बतावणी; युवतीवर अत्याचाराचा प्रयत्नगॅस पुरवठा खंडीत करण्याची बतावणी करुन १० लाखांची फसवणूकमहापारेषणच्या चिंचवड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात आगभरती परीक्षा पद्धतीच्या सर्वंकष अभ्यासासाठी पुण्यात १२ सप्टेंबरला सल्लामसलतपुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

कात्रजमधील मंदिरातून ५ लाखांचे दागिने चोरी

कात्रजमधील मंदिरातून ५ लाखांचे दागिने चोरी

कात्रजमध्ये मंदिर फोडून ५.१७ लाखांचा ऐवज लंपास; बाणेरमध्ये दूध डेअरीतून रोकड आणि कोंढव्यात घरफोडी

marathinews24.com

पुणे – शहरातील कात्रज परिसरातील एका मंदिरातून पाच लाख १७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना घडली. चोरट्यांनी मंदिरातील सोन्याचे दागिने, पितळ्याची समई, रोकड असा पाच लाख १७ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ससून रुग्णालयाजवळ तरुणाला चाकूच्या धाकाने लुटले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रजमधील भिलारवाडी परिसरात श्री अंबाबाई मंदिर आहे. ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री चोरट्यांनी मंदिराचा दरवाज्याचे कुलूप तोडले. चोरट्यांनी मंदिरातील सोन्याचे दागिने, पितळ्याची समई, रोकड असा पाच लाख १७ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आले. कात्रजमधील भिलारवाडी परिसरातील आणखी एका मंदिरातून ६५ हजार रुपयांचे चांदीचे दागिने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करत आहेत.

दूध डेअरीतून दीड लाखांची रोकड लंपास

दूध डेअरीतून एक लाख ६७ हजारांची रोकड लांबविण्यात आल्याची घटना बाणेर रस्त्यावरील सकाळनगर परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत दूध डेअरीच्या मालकांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळनगर परिसरात दूध डेअरी आहे. चोरट्यांनी ५ ऑगस्टला एका इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या दूध डेअरीच्या दरवाज्याचे कुलूप तोडले. चोरट्यांनी गल्ल्यातील एक लाख ६७ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. सहायक पोलीस निरीक्षक सचिन कारंडे तपास करत आहेत.

कोंढव्यात घरफोडी; ३ लाखांचे दागिने चोरी

सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे कोंढ‌व्यातील साईनगर परिसरात असलेल्या जय गणेश ॲव्हेन्यू सोसायटीत राहायला आहेत. तक्रारदार आणि कुटुंबीय ४ ऑगस्ट रोजी मेहुण्याच्या मुलाचा वाढदिवस असल्याने मुंबईला गेले होते. चोरट्यांनी मध्यरात्री सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले. तक्रारदार हे मुंबईहूून परतल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस निरीक्षक अबतुल्लाह चाऊस तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×