Breking News
आवाज बंद कर डीजे, तुला पुणेकरांची शपथ हाय’हातउसने पैसे परत करण्याची बतावणी; युवतीवर अत्याचाराचा प्रयत्नगॅस पुरवठा खंडीत करण्याची बतावणी करुन १० लाखांची फसवणूकमहापारेषणच्या चिंचवड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात आगभरती परीक्षा पद्धतीच्या सर्वंकष अभ्यासासाठी पुण्यात १२ सप्टेंबरला सल्लामसलतपुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळी

आवाज बंद कर डीजे, तुला पुणेकरांची शपथ हाय’

Pune DJ Ban Protest

डीजे बंदीशिवाय माघार नाही, मोर्चातून पुणेकरांचा निर्धार

marathinews24.com

पुणे – ‘आवाज बंद कर डीजे, तुला पुणेकरांची शपथ हाय, संपूर्ण डीजेबंदी झालीच पाहिजे’, ‘शांतता आमचा हक्क आहे’ ग..गणपतीचा, नको गोंधळाचा, माझे कान.. माझा अधिकार, ध्वनीप्रदुषणाला माझा नका, अशा घोषणा देत, हातात फलक घेउन पुणेकरांनी डीजे बंदीसाठी आवाज उठवला. ‘सोलापूर, मुंबई, नागपूरला डीजे बंदी होऊ शकते तर पुण्यात का नाही?’ असा सवाल उपस्थित केला. ध्वनी प्रदुषणाविरूद्ध आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना महापालिकेच्या नागरी सभेत विरोधाला सामोरे जावे लागले. भूमिका मांडत असताना त्यांना मारहाण झाली. त्याचा सकारात्मक निषेध मोर्चात अनेकांनी सहभाग घेतला होता.

गॅस पुरवठा खंडीत करण्याची बतावणी करुन १० लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

‘लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंच’ने केलेल्या आवाहनानुसार रविवारी (दि.६) सकाळी मोठ्या संख्येने नागरिक मोर्चामध्ये सामील झाले होते. जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकातून सुरुवात झाली. तत्पुर्वी पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता. मोर्चात सहभागी झालेल्या सामाजिक, राजकीय पदाधिकार्‍यांसह तरुण-तरूणींनी डीजे बंदीसाठी घोषणाबाजी केली. पुणेरी चिमटे काढलेले फलक हातात घेउन ध्वनी प्रदुषणाचा विरोध केला. सण-उत्सवातील डीजेचा आवाजावर बंदी आणा, आम्हाला ध्वनी प्रदुषणमुक्त उत्सव साजरा करणारे मंडळे नको आहेत, . ‘आवाज बंद कर डीजे, तुला पुणेकरांची शपथ हाय’ अशा डीजे बंदीच्या घोषणा नागरिकांनी दिल्या. पुणे महानगरपालिका इमारतीपर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी जेष्ठ नागरिकांचा सहभाग दिसून आला.

आंदोलनकर्तांच्यावतीने मुकुंद किर्दत यांनी पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, सहआयुक्त अनुजा देशमाने यांना निवेदन दिले. उत्सवा अगोदरच डीजेला प्रतिबंध करावा, संबंधित जबाबदार अधिकार्‍यांची नावे व मोबाइल क्रमांक नंबर जाहीर करावेत. रियल टाईम डेटा दररोज संकेतस्थळावर अपलोड करावा. त्यांच्यावर कारवाईची माहिती प्रसिद्ध करावी. शारीरिक मानसिक नुकसान झाल्यास त्याला भरपाई मिळावी अशा मागणी निवेदनाद्वारे करण्यात आल्या. डीजेबंदी नागपूर सोलापूर,मुंबईला होऊ शकते ते पुण्यात का नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला. आठवड्यात निर्णय न झाल्यास नागरिक पुन्हा नाईलाजाने रस्त्यावर उतरतील असा इशाराही किर्दत यांनी दिला.

‘लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंच ग्रुप

डिजेविरोधामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये एकवटले होते. ‘लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंच’ या नावाने सोशल मीडियावर पुणेकरांचा ग्रुप तयार झाला आहे. मुकुंद किर्दत, सुनीती सु. र., सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, अ‍ॅड. असीम सरोदे, काँग्रेसच्या शहराध्यक्ष दीप्ती चवधरी, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, सत्येंद्र राठी, कौस्तुभ खांडेकर, समीर बर्डे, मिलिंद केळकर, कीर्ती , विनोद पवार, तुषार कासार यांनी सहभाग घेतला आहे.

बापट मोर्चात सहभागी झाले नाही

ध्वनी प्रदुषणाविरुद्ध आवाज उठवणारे विद्यानंद बापट हे आजच्या मोर्चात सहभागी होणार होते. मात्र, सुरक्षिततेच्या कारणास्तव ते मोर्चात सहभाही होउ शकले नाही. रविवारी सकाळपासून विश्रामबाग पोलिसांचे पथक त्यांच्या घरालगत थांबले होते. तर रत्नागिरीमध्येही बापट यांच्या आई-वडिलांना पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे.

राज्यातील सोलापूर, मुंबई,नागपूरला डीजे बंदी होऊ शकते तर पुण्यात का नाही? ‘चार बेस आणि चार टॉप’ला परवानगी दिली असली तरी हे मान्य नाही. यामुळे डेसिबल पातळी वाढून ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या कायद्याचे उल्लंघन होते.

मुकुंद किर्दत, समन्वयक, लाऊड स्पीकरविरोधी पुणेकर मंच

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×