Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुणे जिल्हा नियोजन बैठकीत अवकाळी पाऊस, वाहतूक कोंडीची चर्चा

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाचे वेधले लक्ष

marathinews24.com

पुणे – जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाइन बैठकीत शिवसेना नेत्या आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली.
पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी, नवले पुल तसेच पुणें शहर परिसरातील ब्लॅक स्पॉट्सबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. पर्यटनस्थळी मधमाश्यांच्या हल्ल्यांच्या घटना व अपुऱ्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर “पर्यटन रक्षक” नेमण्याची मागणी त्यांनी केली. तसेच आदिवासी महिला व अत्याचारग्रस्त मुलींसाठी न्यूक्लियस बजेटमधून तात्पुरत्या आर्थिक मदतीची यंत्रणा उभारण्याची सूचना केली.

खरीपासाठी खते-बियाण्यांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करा; बोगस निविष्ठांविरोधात कारवाई करा – सविस्तर बातमी

यावर स्पष्टीकरण देताना, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र वॉर्डन पुनश्च नेमण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पर्यटनस्थळी सुरक्षा रक्षक नेमणूक व न्यूक्लियस बजेटच्या अंमलबजावणीसाठी कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×