वानवडी पोलिसांची कारवाई
marathinews24.com
Pune : देशी-विदेशी दारु विक्रीचा पर्दापाश, माय-लेकाला अटक – आषाढी एकादशीदिवशीच चढ्या भावाने देशी- विदेशी दारूची विक्री करणार्या माय-लेकाला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २२ हजारांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ६ जुलैला रामटेकडी परिसरातील आनंदनगरमध्ये करण्यात आली आहे. भानु उत्तम कांबळ (वय ५० ) आणि सागर उत्तम कांबळे (दोघेही रा. आनंदनगर, रामनगर, रामटेकडी) यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे.
जुन्या वादातून टोळक्याची एकाला बेदम मारहाण – सविस्तर बातमी
आषाढी एकादशीच्या अनुषंगाने (दि. ६) जुलैला वानवडी पोलीस हद्दीत गुन्हे प्रतिबंध व अवैध दारु धंद्यांची तपासणी करीत होते. त्यावेळी तपास पथकाचे पोलीस अंमलदार अमोल पिलाणे आणि अभिजित चव्हाण यांना दारूविक्रेत्या माय-लेकाची माहिती मिळाली. आषाढी एकादशी असतानासुध्दा आरोपी भानु कांबळे व त्यांचा मुलगा सागर कांबळे हे आनंदनगरमध्ये पत्र्याचे शेडमध्ये देशी-विदेशी दारुच्या बाटल्यांची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी धाव घेत छापा टाकला.
आरोपी भानु कांबळे हिच्याकडे तब्बल २२ हजार रूपये किंमतीचा प्रोव्हिबिशनचा माल आणि रोकड जप्त केली. चौकशीत तिने दारु विक्रीचा परवाना नसुन, मुलगा सागर हा मला विक्रीसाठी दारू आणुन देत असल्याची कबुली दिली. त्यानंतर मी आमच्या ओळखीच्या ग्राहकांना दारूची विक्री करीत असल्याचे तिने सांगतले. याप्रकरणी दोघांविरूद्ध मुंबई प्रोव्हिबिशन अॅक्ट कलम ६५(ड) प्रमाणे वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस उपायुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, पोलीस निरीक्षक विजसकुमार डोके, उपनिरीक्षक धनाजी टोणे, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, गोपाळ मदने, विष्णु सुतार, अभिजित चव्हाण, अतुल गायकवाड, दिपक क्षीरसागर, सुजाता फुलसुंदर, पुनम राणे यांनी केली.