काम देण्याचा बहाणा करत, ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकवले
marathinews24.com
पुणे – पादचारी ज्येष्ठ महिलेकडे बतावणी करुन चोरट्यांनी २५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना येरवडा भागात घडली.
सावधान…प्रखर लेझर सोडण्यास बंदी – सविस्तर बातमी
याबाबत एका ज्येष्ठ महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७० वर्षीय महिला शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास येरवड्यातील कामराजनगर परिसरातून निघाल्या होत्या. त्या वेळी दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. ‘तुम्हाला काम पाहिजे का ?’, अशी विचारणा केली. त्यांचे लक्ष नसल्याची संधी चोरट्यांनी साधली. महिलेच्या गळ्यातून २५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक नंदनवार तपास करत आहेत.