Breking News
Shubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एकLullanagar Roof Collapse : पुण्यात पत्र्याचे आच्छादन कोसळून दोघे जखमीShirur Crime News : शिरुरमध्ये हाॅटेल चालकाचा गोळ्या झाडून खूनLohegaon Hostel Sealing : पुण्यातील लोहगावामधील ११ विनापरवाना हॉस्टेल सील

Pune Ganesh Stotra World Record :पुण्यात १२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी गणेशस्तोत्र गायनातून रचला जागतिक रेकॉर्ड

Pune Ganesh Stotra World Record :पुण्यात १२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी गणेशस्तोत्र गायनातून रचला जागतिक रेकॉर्ड

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या अनोख्या उपक्रमाची ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष उपक्रमात तब्बल १२ हजार ३६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत एकाच वेळी ऑनलाइन पद्धतीने गणेशस्तोत्राचे पठण केले. (Pune Ganesh Stotra World Record) पुण्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून उपक्रमाची नोंद ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एसएनडीटी मेट्रो स्थानकावर दिवाळीचा उत्साह – सविस्तर बातमी 

गणेशोत्सवातील धार्मिक परंपरा आणि विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ठरवून दिलेल्या वेळेनुसार सहभागी शाळांमधील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन माध्यमातून एकाच वेळी गणेशस्तोत्राचे सामूहिक पठण केले. (Pune Ganesh Stotra World Record) या विक्रमाची नोंद ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये करण्यात आली असून यावेळी एशिया बुकच्या न्याय निर्णायक चित्रा जैन यांनी या रेकॉर्डसचे प्रमाणपत्र ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्याकडे सुपूर्द केले.

पुणे शहरासह परिसरातील विविध भागांतील शाळांनी या उपक्रमात सहभाग घेतला. यामध्ये महेश विद्यालय इंग्लिश स्कूल (कोथरूड), महेश विद्यालय सेमी इंग्लिश स्कूल (कोथरूड), धनिराज स्कूल (वाकड), पूना स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड (कोरेगाव पार्क), जागृती ब्लाइंड स्कूल फॉर गर्ल्स, सिंहगड इन्स्टिट्यूट (एरंडवणे), अहिल्यादेवी शाळा, पुणे, रमणबाग स्कूल, केएचएस स्कूल कन्नड, न्यू मा. वि. शाळा, हुजूरपागा (कात्रज), हुजूरपागा (नारायण पेठ), हुजूरपागा इंग्लिश मीडियम (नारायण पेठ), क्लारा स्कूल (बी. टी. कवडे रोड), क्लारा स्कूल (सिंहगड रोड), कटारिया स्कूल, भाऊ रंगारी मंडप किड्स, प्राध्यापक नाथ हरी पुरंदरे प्राथमिक विद्यालय, विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल (टिळक रोड) या शाळांचा समावेश होता.

गणेशोत्सव हा केवळ एक उत्सव न राहता तो संस्कार आणि सामाजिक एकोप्याचं माध्यम ठरावा, हा आमचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीशी आणि गणेशभक्तीशी जोडण्याच्या उद्देशाने सामूहिक गणेशस्तोत्र पठणाचा उपक्रम आयोजित केला होता, त्यात तब्बल १२ हजार ३६० विद्यार्थ्यांनी एकाच वेळी ऑनलाइन माध्यमातून सहभाग घेतला, ही निश्चितच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हा उपक्रम संस्मरणीय ठरला असून या विक्रमी उपक्रमाची ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये नोंद झाली. त्यामुळं गणेशभक्ती आणि संस्कृतीचा हा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचण्यास निशिचतच मदत होईल

– पुनीत बालन
उत्सवप्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×