Breking News
Women Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबितDharau Marathi Movie 2026 : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

Pune Ganesh Visarjan : पुण्यात १० हजार पोलिसांचा फौजफाटा, गर्दीच्या नियोजनाला विशेष प्राधान्य- पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Pune Ganesh Visarjan : पुण्यात १० हजार पोलिसांचा फौजफाटा, गर्दीच्या नियोजनाला विशेष प्राधान्य- पोलीस आयुक्त अमितेश कुमार

गणपती विसर्जन मिरवणूक

marathinews24.com

पुणे – शहरात गणेशोत्सव आनंदा साजरा होत असतानाच गणेश विसर्जन Pune Ganesh Visarjan मिरवणूकही सुरक्षितरित्या आणि शिस्तबद्धपणे पार पाडण्यासाठी पुणे पोलीस दल सज्ज झाले आहे. विशेषतः गर्दीच्या नियोजनाला आम्ही प्रथम प्राधान्य दिले असून, मध्यवर्ती भागातील मुख्य मिरवणूक मार्गासह महत्वाच्या ठिकाणांवर तब्बल साडेतीन हजार सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा वॉच ठेवण्यात येणार आहे. वाहतूक नियोजन, ध्वनिप्रदूषण तक्रारींची दखल घेउन कारवाई करणे, गर्दी व्यवस्थापनासह कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने नियोजन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

वाहतूक नियमांचे पालन करून पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी सहकार्य करा- रवींद्र आहेरराव – सविस्तर बातमी 

Pune Ganesh Visarjan मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गणेश विसर्जनाच्या तयारीचा आढावा मांडला. यावेळी सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर आयुक्त मनोज पाटील, अपर आयुक्त संजय पाटील, अपर आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त कृषीकेश रावले, उपायुक्त गौहर हसन, उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर उपस्थित होते. विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी, भाविकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून विशेष प्राधान्य दिले आहे.

गुन्हे शाखाही अ‍ॅक्शन मोडवर, पोलीस उपायुक्तांचे प्लॅनिंग

गर्दीवर नियंत्रण ठेवणे, सोनसाखळी व मोबाइल चोरट्यांवर लक्ष ठेवण्यास गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून प्राधान्य देण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी शंकर खटके, एसीपी राजेंद्र मुळीक यांचे पथक संपुर्ण परिसरात पायी पेट्रोलिंग करणार आहेत. त्यासोबतचत संबंधित अधिकारी ऑनफील्ड राहणार आहेत. मानाचे गणपती दगडूशेठ हलवाई, भाऊ रंगारी विजर्सन रथासह इतर मंडळांच्या गणपतींचे वेळेत Pune Ganesh Visarjan होण्यासाठी मॅरेथॉन बैठका झाल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी विसर्जन मिरवणूक वेळेत पार पाडण्याचा मानस पोलिसांचा आहे. दरम्यान, २५ ते २६ सप्टेंबर कालावधीत शहरभरात ठिकठिकाणी रस्ते वाहतूकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

मिरवणूकीसाठी पोलीस बंदोबस्त

अपर पोलीस आयुक्त-४, पोलीस उपायुक्त १४, सहायक आयुक्त- ३४, पोलीस निरीक्षक- १५४, एपीआय-उपनिरीक्षक-६७५, पोलीस अमलदार-७ हजार , होमगार्ड- ९००, एसआरपीएफ- २ कंपन्या, वाहतूक बंदोबस्त- उपायुक्त-१, पोलीस निरीक्षक-१३, एपीआय-३३, अमलदार-७७५, ट्राफिक वॉर्डन-१००, स्वयंसेवक- २००

ड्रोनद्वारे ठेवली जाणार करडी नजर

विसर्जन सोहळ्यावर नजर ठेवण्यासाठी पुणे पोलिसांकडून ड्रोनद्वारे चित्रीकरण केले जाणार आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून जागोजागी तपासणी केली जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील कर्मचार्‍यांसह गुन्हे शाखेची पथके तैनात करण्यात आली आहेत. त्याशिवाय (क्यूआरटी) शीघ्र पथकाकडून जबाबदारी पार पाडली जाणार आहे.

सीसीटीव्ही आणि वॉचटॉवरची भेदक राहणार नजर

Pune Ganesh Visarjan  अलका टॉकीज चौक, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि केळकर रस्ता या परिसरांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. संबंधित सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे जाळे उभारले असून, नियंत्रण कक्षातून निरीक्षण करण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहे. सुमारे साडेतीन हजार सीसीटीव्ही आणि वॉच टॉवरवरील कॅमेर्‍यांच्या माध्यमातून प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवले जाणार आहे. आवश्यक ठिकाणी वॉच टॉवर उभारून त्यातूनही मिरवणुकीवर नजर ठेवली जाणार आहे.

ध्वनिप्रदूषण जाणवल्यास थेट ११२ वर तक्रार करा, कारवाई होईल

मिरवणुकीत ठरवून दिलेल्या वेळेचे आणि ध्वनीमर्यादेचे पालन सर्व मंडळांनी करणे बंधनकारक आहे. नागरिकांना आपल्या हद्दीत ध्वनी प्रदुषण जाणवल्यास त्यांनी पोलीस नियंत्रण कक्ष ११२ वर संपर्क करुन माहिती द्यावी. संबंधिताविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. Pune Ganesh Visarjan  लेझर लाईट्स आणि हाय-डेसिबल डीजे सिस्टीमवर कडक निर्बंध लादले आहेत. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर थेट गुन्हे दाखल करून धडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, रेकॉर्डवरील गुन्हेगार, तडीपार असलेल्यांवर नजर ठेवणे, मिरवणुकीत अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी साध्या वेषातील कर्मचारी आणि विशेष महिला पथके तैनात केली जाणार आहेत.

पुणेकरांनी गणपती बाप्पांचे स्वागत अतिशय दिमाखात आणि शिस्तबद्ध पणे केले आहे. आता विसर्जन मिरवणूकीलाही प्रत्येक मंडळांसह कार्यकर्ते, भाविकांनी पोलिसांना सहकार्य करावे. ध्वनी प्रदुषण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. नियमांचे पालन करुन बाप्पाचे विसर्जन सोहळा सुस्थितीत पार पाडण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा

– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×