Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune Ganeshotsav Theft : गणेशोत्सवात पुण्यातील भाविकांचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना हरयाणात पकडले

Pune Ganeshotsav Theft

पोलिसांचा साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास; २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

marathinews24.com

पुणे – Pune Ganeshotsav Theft : गणेशोत्सवात भाविकांच्या गळ्यातील दागिने, मोबाइल चोरून पसार झालेल्या चोरट्यांच्या टोळीला विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने हरयाणातील पलवल भागातून अटक केली. गुजरात आणि हरयाणा पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून १३ लाख रुपयांचे दागिने, मोटार असा २३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पुण्यात आईने मुलीला देहविक्रीस प्रवृत्त केले – सविस्तर बातमी 

‘गणेशोत्सव, तसेच विसर्जन मिरवणुकीत भाविकांचे दागिने चोरीला गेल्याच्या घटना घडल्या हाेत्या. या प्रकरणाचा तपास विश्रामबाग पोलिसांच्या पथकाकडून करण्यात येत होता. तपासात मिळालेल्या माहितीनुसार चोरटे हरयाणात पसार झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी साडेचार किलाेमीटर प्रवास करुन हरयाणायील पलवल गावातून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून नऊ गुन्हे उघडकीस आले असून, २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,’अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी दिली.

अजय समशेरन विनोदकुमार रुपसिंग कोळी (वय २०, रा. समसाबाद पलवल, हरयाणा) अमन समशेर अनिलकुमार नारायणसिंग कोळी (वय २४, रा. आदर्श काॅलनी, पलवल, हरयाणा) दीपक समशेर राजूभाई सापसिंग (वय २१, रा. हिरानगर काॅलनी, पलवल, हरयाणा) यांना अटक करण्यात आली. Pune Ganeshotsav Theft या प्रकरणातील एक आरोपी गुजरातमधील अरवली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक असल्याची माहिती मिळाली होती. अरवली पोलिसांच्या सहकार्याने त्याला या गुन्ह्यात ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. तेव्हा आरोपीनी गणेशोत्सवात चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर हरयाणातील पलवल भागातून आरोपींना अटक करण्यात आली.

आरोपी मोटारीतून पुण्यात आले होते. त्यांच्याकडून मोटार, तसेच दागिने असा २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, उमेश कारके, उपनिरीक्षक सत्यवान गेंड, मेहबूब मोकाशी, सचिन कदम, नितीन मु्ंढे, महेश कदम, शैलेश सुर्वे, सचिन अहविळे, शशिकांत दरेकर, साहिल शेख, कैलास डुकरे, जाकीर मणीयार, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, फिरोज इनामदार, अर्जुन थोरात, नितीन बाबर यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×