Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

पुण्यात प्राण प्रतिष्ठापना सोहळा, गणेश मूर्ती खरेदीनिमित्त वाहतूक बदल

Pune Traffic Changes : पुण्यात नवरात्रौत्सवानिमित्त वाहतूक बदल

शिवाजीनगर, मध्यवर्ती भाग व मुंढवा परिसरात पर्यायी मार्गांची व्यवस्था

marathinews24.com

पुणे – प्राणप्रतिष्ठापना सोहळा, तसेच शिवाजीनगर भागातील डेंगळे पूल परिसरात गणेशमूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. डेंगळे पूल, मध्य भागातील छत्रपती शिवाजी रस्ता, सारसबाग, मुंढव्यातील केशवनगर परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहे. शिवाजीनगर येथील डेंगळे पूल परिसरात गणेशमूर्ती विक्रेत्यांनी स्टाॅल थाटले आहेत. या भागातील वाहतूक व्यवस्थेत शनिवारी (१२ सप्टेंबर), रविवारी (१३ सप्टेंबर), तसेच सोमवारी (१४ सप्टेंबर) वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.

श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा १३४वा गणेशोत्सव उत्साहात – सविस्तर बातमी 

प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा चौक ते मंडईतील गोटीराम भैय्या चौक हा मार्ग वाहतुकीस बंद असणार आहे. वाहनांनी संताजी घोरपडे पथ, कुंभारवेस चौक, मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौक याा मार्गाने जावे. जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी पुतळा चौक, खुडे चौकमार्गे कुंभारवाड्याकडे जाणाऱ्या वाहनांनी छत्रपती शिवाजी पुलावरुन डावीकडे वळून संताजी घोरपडे मार्गाने कुंभारवेसकडे जावे. सारसबाग परिसरातील स्वातंत्रवीर सावरकर पुतळा चौक ते समाधना भेळ केंद्र परिसरात सर्व प्रकारचे वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा, नीलायम चित्रपटगृहाजवळ वाहने लावावीत, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सोमवारी (१४ सप्टेंबर) मध्य भागात वाहतूक बदल करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. कसबा पेठेतील फडके हौद चौक ते जिजामाता चौक, फुटका बुरूज, अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक), मोती चौक, मंगला चित्रपटगृहसमोरील रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. मुंढव्यातील केशवनगर परिसरात मूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी (१४ सप्टेंबर) या भागात वाहतूक बदल करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक पर्याची वळविण्यात आली आहे.

शिवाजीनगर बसस्थानकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस मार्गात बदल करण्यात आला आहे. शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस स. गो. बर्वे चौक (माॅडर्न कॅफे), जंगली महाराज रस्ता,डेक्कन जिमखाना, टिळक रस्तामार्गे स्वारगेटकडे जातील. महापालिका भवन परिसरातून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस जंगली महाराज रस्त्याने जातील.

पार्किंग व्यवस्था

– कामगार पुतळा ते छत्रपती शिवाजी पुतळा

– कामगार पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी पुतळा
– संताजी घोरपडे पथ ते गाडगीळ पुतळा

– टिळक पूल ते भिडे पूल, नदीपात्रातील रस्ता
– मंडईतील वाहनतळ

– छत्रपती शिवाजी रस्त्यावरील शाहू चौक ते राष्ट्रभूषण चौक

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×