Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात देखावे पाहण्यासाठी मध्यवर्ती भागातील मुख्य रस्ते सायंकाळी ५ नंतर बंद

 Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात देखावे पाहण्यासाठी मध्यवर्ती भागातील मुख्य रस्ते सायंकाळी ५ नंतर बंद

वाहतूक पोलिसांचे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सवाच्या काळात शहरातील भव्य देखावे आणि आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी पुण्यासह राज्यभरातून येणाऱ्या नागरिकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन वाहतूक शाखेने मध्यवर्ती भागातील (Pune Ganeshotsav Traffic) वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल लागू केले आहेत. शुक्रवार १८ ते २५ सप्टेंबरपर्यंत दररोज सायंकाळी ५ वाजल्यापासून गर्दी ओसरेपर्यंत लक्ष्मी रोड, शिवाजी रोड, बाजीराव रोडसह प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनधारकांनी सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलीस उपआयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

जनतेनी सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचा संदेश; ‘लोकसंवाद’मधून नागरिकांना मार्गदर्शन – सविस्तर बातमी 

प्रमुख बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग

– लक्ष्मी रोड (सेवासदन चौक ते टिळक चौक)

पर्यायी मार्ग- बाजीराव रोडवरून येणाऱ्या वाहनांनी पुरम चौकातून टिळक रोडने पुढे जावे. शनिपार चौकातून येणाऱ्या वाहनांनी डावीकडे वळून इच्छित स्थळाकडे जावे. Pune Ganeshotsav Traffic

– शिवाजी रोड (रामेश्वर चौक ते जेधे चौक)

शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक – जे. एम. रोड – अलका टॉकीज चौक मार्गे टिळक रोड किंवा शास्त्री रोडचा वापर करावा. अथवा सिमला चौक – कामगार पुतळा चौक – शाहीर अमर शेख चौक – नेह्रू रोड मार्गे स्वारगेटकडे जावे.

– बाजीराव रोड (पूरम चौक ते आप्पा बळवंत चौक)

पूरम चौकातून टिळक रोडने टिळक चौक आणि उजवीकडे वळून केळकर रोडने आप्पा बळवंत चौकाकडे जावे. विशेष टीप : टेलिफोन भवन ते पूरम चौक या दरम्यानचा एकेरी वाहतुकीचा नियम शिथील करून हा रस्ता दुहेरी करण्यात आला आहे.

– कुंभारवेस ते शंकर शेठ रोड

कुंभारवेस चौक – पवळे चौक – साततोटी चौक – योजना हॉटेलवरून उजवीकडे वळून देवजी बाबा चौक – हमजेखान चौक – महाराणा प्रताप रोड मार्गे घोरपडी पेठ पोलीस चौकी – झगडे आळी ते शंकर शेठ रोडने इच्छित स्थळी जावे.

– इतर अंतर्गत मार्ग

सिंहगड गॅरेज चौक, दिनकरराव जवळकर पथ, सणस रोड, पानघंटी चौक, कॅम्प भागातील गावकसाब मशिद व कोहिनुर चौक परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक बंदी घालण्यात आली असून नागरिकांसाठी परिसरातील गल्लीबोळांमधून पर्यायी मार्ग खुले करण्यात आले आहेत.

नो-पार्कींग झोन घोषित

Pune Ganeshotsav Traffic गर्दीच्या काळात वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी सायं. ५ नंतर सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किंग करण्यास सक्त मनाई करण्यात आली असल्‍याची माहिती वाहतुक विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. शिवाजी रोड- जिजामाता चौक ते मंडई चौक, मंडई परिसर : मंडई ते शनिपार चौक, बाजीराव रोड : शनिपार चौक ते फुटका बुरुज, आप्पा बळवंत चौक : आप्पा बळवंत चौक ते मोती चौक, टिळक रोड : एस. पी. कॉलेज मुख्य प्रवेशद्वार ते टिळक चौक, शास्त्री रोड

सेनादत्त पोलीस चौकी ते टिळक चौक एकेरी वाहतुकीच्या नियमांत तात्पुरती शिथिलता

नागरिकांची आणि पादचाऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कुमठेकर रस्ता, सदाशिव पेठ, फडके हौद रस्ता, नाईक रस्ता आणि एम. जी. रोड परिसरातील एकेरी वाहतुकीचे नियम आवश्यकतेनुसार सायंकाळी ५ नंतर तात्पुरत्या स्वरूपात शिथील केले जातील. दरम्यान, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका आणि पोलीस वाहने यांसारख्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना बंद रस्त्यांवरून प्रवेशासाठी पूर्ण सूट देण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×