Breking News
Bandhavgarh Wildlife Conservation : बांधवगड येथे ‘श्रीमती इंद्राणी बालन इंटरप्रिटेशन सेंटर’चे भूमिपूजनBirsa Munda Jayanti 2026 : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त घोडेगावमध्ये जनजातीय गौरव दिनChhagan Bhujbal Pune Visit : भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या विकासकामांची मंत्री छगन भुजबळ यांनी केली पाहणीShivaji Maharaj Wagh Nakh Exhibition : लंडनहून आणलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ पुणेकरांसाठी उपलब्ध करून द्यावीतPune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविले

Pune Graduate Teacher Election Leave : पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदारांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा

Pune Graduate Teacher Election Leave

खासगी आस्थापनातील मतदारांना दोन ऐवजी चार तासाची विशेष सवलत

marathinews24.com

पुणे – Pune Graduate Teacher Election Leave : भारत निवडणूक आयोगाने पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयान्वये या निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी म्हणजे शुक्रवार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या १६ ऑक्टोबर २०२६ च्या सुधारित परिपत्रकानुसार खासगी आस्थापनात काम करणाऱ्या मतदारांना मतदानासाठी २ ऐवजी ४ तासांची विशेष सवलत द्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

पुणे लोकमान्य फेस्टिवलमध्ये ‘महिला दांडिया’ उत्साहात संपन्न; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – सविस्तर बातमी 

निवडणुकीतील मतदार असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १३५ब नुसार भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही रजा त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे. ही रजा केवळ त्या मतदार संघाचे मतदार असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असल्याने सर्व शासकीय कार्यालयांचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू राहील याची काळजी कार्यालय प्रमुखांनी घ्यावी.

ही विशेष नैमित्तिक रजा खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना लागू होणार नाही. (Pune Graduate Teacher Election Leave)  खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या पदवीधर, शिक्षक मतदारांना मतदानासाठी यापूर्वी कळविलेल्या दोन तासांऐवजी चार तासांची विशेष सवलत देण्यात यावी, असे विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली -उगले यांनी कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×