बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी मारला डल्ला
marathinews24.com
पुणे – Pune House Burglary : बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याच्या घटना नाना पेठ, केशवनगरात घडल्या आहेत. याप्रकरणी समर्थ आणि मुंढवा पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी तपासाला गती दिली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती दिली.
भरदिवसा जेष्ठाला लुटले, ७० हजारांची अंगठी चोरीला – सविस्तर बातमी
नान पेठ परिसरातील मॉ परवेझ रोडवर असलेल्या मेलोनी पार्कमधील इमारतीतील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख रुपयांची रोकड चोरुन नेली आहे. ही घटना २१ ते २८ ऑक्टोबर कालावधीत घडली आहे. याप्रकरणी ७८ वर्षीय जेष्ठाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदाराचा भाउ संबंधित इमारतीत राहायला असून, त्यांचे कुटुंब बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून घरातील २ लाखांची रोकड चोरुन नेली. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार वाघेरे तपास करत आहेत.
मुंढव्यातील केशवनगर परिसरात असलेल्या जी. जी. हाईटस श्रीकृपा सोसायटीत घरफोडी करुन चोरट्यांनी १ लाख ५५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना २८ ऑक्टोबरला रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी ४० वर्षीय तरुणाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. (Pune House Burglary) त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार हे श्रीकृपा सोसायटीत राहायला असून, २८ ऑक्टोबरला त्यांचा फ्लॅट बंद असताना चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील दीड लाखांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कवीराज पाटील तपास करत आहेत.























