Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune Senior Citizen Robbery : भरदिवसा जेष्ठाला लुटले, ७० हजारांची अंगठी चोरीला

Pune Senior Citizen Robbery

स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Pune Senior Citizen Robbery : रस्त्याने पायी चाललेल्या जेष्ठ नागरिकाला अडवून दोघा चोरट्यांनी बतावणी करीत त्यांच्याकडील ७० हजारांची सोन्याची अंगठी चोरुन नेली आहे. ही घटना २५ ऑक्टोबरला भरदुपारी एक वाजण्याच्या सुमारास स्वारगेट परिसरातील मुकूंद नगरातील सुजय गार्डन समोर घडली आहे. याप्रकरणी महर्षीनगरात राहणार्‍या ६७ वर्षीय नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून संबंधित लुटमार करणारे टोळके सुसाट आहे. त्यांनी अशाच प्रकारे लुटमार केल्याच्या घटना घडल्या आहेत.

तरुणाच्या बँक खात्यातील रक्कम परस्पररित्या वळवून फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक हे महर्षी नगरात राहायला असून, २५ ऑक्टोबरला दुपारी एकच्या सुमारास ते सुजय गार्डनसमोरील रस्त्याने पायी घरी जात होते. त्यावेळी दोघा जणांनी त्यांना थांबवले. आमच्या वडिलांचे निधन झाले असून, (Pune Senior Citizen Robbery) आम्हाला मंदीरात पैसे दान करायचे आहेत. आत्मशुद्धीसाठी आम्हाला तुमची अंगठी पाहिजे आहे, असे सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी तक्रारदार जेष्ठाकडून हातातील ७० हजारांची सोन्याची अंगठी ताब्यात घेतली. हातचलाखी करुन अंगठी पुन्हा पिशवीत टाकल्याचे भासवून दगड ठेवला. काही अंतरावर गेल्यानंतर जेष्ठाला पिशवीत अंगठी नसून दगड असल्याचे दिसून आले. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील शेळके तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×