आंबेगाव, लोहगाव भागात घरफोडी
marathinews24.com
पुणे – Pune House Burglary News : शहराच्या वेगवेगळ्या भागात सदनिकांचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा सात लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. कात्रजमधील आंबेगाव, तसेच लोहगाव परिसरात घरफोडीच्या घटना घडल्या.
देवस्थानच्या नावे बनावट संकेतस्थळ – सविस्तर बातमी
आंबेगावमधील टेल्को काॅलनी भागात त्रिमूर्ती प्रेस्टीज सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ४० हजारांची रोकड आणि दागिने असा चार लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Pune House Burglary News पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आणि कुटुंबीय हे बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाटातून रोकड आणि दागिने असा ऐवज चोरुन नेला. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे तपास करत आहेत.
लोहगावमधील संतनगर भागात एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ४२ हजार रुपये, सोन्याचे दागिने असा दोन लाख २६ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एकाने लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे तपास करत आहेत.
मंदिरातील दानपेटीचे कुलुपू तोडून रोकड चोरी
सोसायटीच्या आवारातील मंदिरात शिरलेल्या चोरट्यांनी दानपेटीचे कुलूप तोडून २० हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे हडपसरमधील कुबेरा विहार सोसायटीत राहायला आहेत. सोसायटीच्या आवारात गणेश मंदिर आहे. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) मध्यरात्री सोसायटीच्या आवारातील भिंतीवरुन उडी मारुन शिरले. चोरट्यांनी मंदिरात ठेवलेल्या दानपेटीचे कुलूप तोडले. दानपेटीतील २० हजार रुपयांची रोकड चोरुन चोरटे पसार झाले. पोलीस कर्मचारी एन. टी. किर्वे तपास करत आहेत.























