Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune Jewellery Theft : पुण्यात काका-पुतण्याने केली सव्वा दोन कोटींच्या दागिन्यांची चोरी

Pune Jewellery Theft : पुण्यात काका-पुतण्याने केली सव्वा दोन कोटींच्या दागिन्यांची चोरी

अवघ्या १२ तासांत खडक पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – Pune Jewellery Theft : दागिने बनवणार्‍या व्यावसायिकाच्या घराचे कुलूप तोडून तब्बल २ कोटी २० लाखांचे दागिने चोरणार्‍या काका-पुतण्याला खडक पोलिसांनी अवघ्या १२ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीतील संपुर्ण ऐवज जप्त करण्यात आला आहे. खडक पोलिसांच्या तपासाबद्दल पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त संजय दराडे, अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त कृषीकेश रावले यांनी अभिनंदन केले आहे.

पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी सोनसाखळी हिसकावणार्‍या दोघांना बेड्या, ६ गुन्हे उघडकीस – सविस्तर बातमी 

मुस्तफा नजीर शेख (वय ३६ रा. रविवार पेठ ) आणि सरफराज उर्फ आवेज मैनुद्दीन शेख (वय २२ रा.काचआळी रविवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मोहम्मद तौफिक रज्जाक खान वय ३६ रा. रविवार पेठ यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. (Pune Jewellery Theft) तक्रारदार खान यांचा दागिने बनवण्याचा व्यवसाय असून, विविध भागातील सराफ त्यांच्याकडे दागिने बनवण्यासाठी देतात. १० ऑक्टोबरला तक्रारदार यांच्यासह पत्नी घरी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडले. कपाटातील २ किलो २०० ग्रॅम वजनाचे २ कोटी २० लाखांचे दागिने, सोन्याची बिस्कीटे चोरुन नेली.

खडक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावेळी हवालदार हेमंत पेरणे, जमदाडे, मयूर भोसले, सैफ नदाफ यांना तक्रारदार राहत असलेल्या घराजवळ दा संशयितरित्या फिरत असल्याचे दिसून आले. तपासात दोघेही तक्रारदाराच्या इमारतीत राहत असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने आरोपी मुस्तफा शेख आणि सरफराजला ताब्यात घेतले. दोघेही काका-पुतण्या असल्याचे निष्पन्न झाले. मुस्तफा स्क्रॅप विक्रीचा तर सरफराज हा चावी बनवण्याचा व्यवसाय करतो. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे . ही कामगिरी उपायुक्त कृषीकेश रावले, एसीपी सचिन हिरे, वरिष्ठ निरीक्षक धनंजय पिंगळे, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, उपनिरीक्षक राहुल मखरे, उपनिरीक्षक दाढे, खाडे, संतोष मोहिते, विनोद शिंदे, नीलेश साबळे, विकास पांडोळे, उमेश मठपती, कुडले यांनी केली. .

दागिने बनवणार्‍या व्यावसायिकाच्या घरातील तब्बल सव्वा दोन कोटींचे दागिने चोरणार्‍या काका-पुतण्याला खडक पोलिसांनी १२ तासात अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील १०० टक्के पेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कृषीकेश रावले, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×