Breking News
Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळा

पुण्यात मेट्रो ठेकेदाराचे खंडणीसाठी अपहरण करणारे अटकेत

Pune Illegal Pistol Seizure

५० लाखांची मागितली होती खंडणी

marathinews24.com

पुणे – खडी क्रशर प्लॅन्टसाठी जागा दाखविण्याची बतावणी करुन मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आले. याप्रकरणी खराडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. अटक केलेले आरोपी खडी क्रशर (स्टोन क्रशर) चालक आहेत.

पुण्यात घरगुती गॅसचा काळा बाजार; दुकानावर छापा – सविस्तर बातमी 

सागर दत्तात्रय झुरुंगे (वय ३९), विजय सुरेश वाळुंज (वय ३८), राजू विजयकुमार सहाणे (वय ३२), रुपेश शिवाजी गावडे (वय ३८, सर्व रा. लोणीकंद, पुणे-अहिल्यानगर रस्ता), प्रकाश बाळासाहेब राऊत (वय ३४, रा. तुळापूर, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. मेट्रोतील ठेकेदााराने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार ४० वर्षीय ठेकेदार मूळचे उत्तर प्रदेशातील कानपूरचा रहिवासी आहे. सध्या ते गहुंजे भागात राहायला आहेत. आरोपी झुरुंगे याच्याशी त्यांची ओळख झाली होती. ठेकेदाराने झुरुंगे याच्याकडून खडी खरेदी केली होती. खडी क्रशर व्यवसायासाठी जागा दाखवितो, असे सांगून आरोपींनी त्यांना मंगळवारी (दि.१४) खराडी आयटी पार्क परिसरात बोलावले. उपाहारगृहाजवळ ते दुपारी बाराच्या सुमारास थांबले होते. आरोपींनी त्यांना जागा दाखविण्याचा बहाणा केला. आरोपींनी त्यांना मोटारीतून एके ठिकाणी नेले. त्यांच्याकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास खराडी परिसरात सोडून आरोपी पसार झाले. घाबरलेल्या व्यावासायिकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. परिमंडळ सातचे उपायुक्त सोमय मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसंनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी तपास करुन पसार झालेल्या पाच आरोपींना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गोडसे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×