Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

मुंढव्यात चोरट्यांकडून १४ मोबाइल जप्त

मुंढव्यात चोरट्यांकडून १४ मोबाइल जप्त

२.२७ लाखांचे १४ मोबाइल जप्त

marathinews24.com

पुणे – गर्दीत नागरिकांकडील मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यांना मुंढवा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख २७ हजार रुपयांचे १४ मोबाइल जप्त करण्यात आले. प्रणित नरेंद्र जाधव (वय २०, रा. सर्वोदय काॅलनी, मुंढवा), राहुल सुरेश सहाणी (वय २२, रा. थिटे वस्ती, खराडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जाधव, सहाणी यांनी गर्दीत नागरिकांकडील मोबाइल लांबविले होते. मुंढवा पोलिसांकडून मोबाइल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता.

गांजा तस्करी प्रकरणात फरार झालेला गजाआड – सविस्तर बातमी 

तपासात मिळालेल्या माहितीनुसार, जाधव आणि सहाणी यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून १४ माेबाइल संच जप्त करण्यात आले. पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनीक, गुन्हे शाखचेे निरीक्षक सागर गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गणेश पिंगुवाले, उपनिरीक्षक युवराज पोमण, संभाजी नाईक, हवालदार विनोद साळुंके, राहुल धोत्रे, योगेश गायकवाड, शिवाजी धांडे, चेतन गायकवाड, राहुल मोरे, सचिन बोराटे, रुपेश तोडेकर यांनी ही कारवाई केली.

सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडी

सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख २१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना सदाशिव पेठेत घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुनसार, तक्रारदार ६८ वर्षीय ज्येष्ठ महिला सदाशिव पेठेतील उष:काल सोसायटीत राहायला आहेत. त्या सेवानिवृत्त आहेत. रविवारी (६ सप्टेंबर) दुपारी पावणेतीनच्या सुमारास सदनिका बंद करुन बाहेर पडल्या. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातून दोन लाख २१ हजार रुपयांचे दागिने लांबविले. ज्येष्ठ महिला सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घरी परतल्या. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक कारके तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×