Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

फिट इंडिया, प्रदूषणमुक्त पुण्यासाठी पाच हजार पुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग

फिट इंडिया, प्रदूषणमुक्त पुण्यासाठी पाच हजार पुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग

आरोग्यपूर्ण जीवनशैली, प्रदूषणमुक्त पुण्यासाठी पाच हजार पुणेकर रस्त्यावर – पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने ‘पुणे ऑन सायकल रॅली’, ‘पुणे फॅमिली वॉकेथॉन’

marathinews24.com

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून रमाबाई आंबेडकर महिला सबलीकरण केंद्राच्या वतीने ‘पुणे ऑन पेडल्स’ सायकल रॅली, तसेच ‘पुणे फॅमिली वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार व प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वज दाखवून रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिर येथून निघून कर्वे रोड मार्गे डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते पुन्हा बालशिक्षण मंदिर अशी समाप्त झाली.

आदर्श शिक्षकांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान – सविस्तर बातमी 

या रॅलीच्या निमित्ताने १५० गरीब गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. रॅलीत सहभागी प्रत्येकाला पदक, प्रमाणपत्र आणि टी-शर्ट देऊन गौरविण्यात आले. सुमारे पाच हजार पुणेकर या सायकल रॅली व वॉकेथाॅनमध्ये सहभागी झाले होते. प्रसंगी माजी नगरसेवक जयंत भावे, विश्राम कुलकर्णी आदी उपस्थित होते.

गिर्यारोहक गणेश आगाशे, खोखो प्रशिक्षक पुष्कर बर्वे, खोखो पुरस्कार विजेती राखी बर्वे, आयर्नमन स्पर्धा विजेते कुणाल आणि मीनल काशीकर, निवृत्त पोलीस अधिकारी विष्णु ताम्हाणे, क्लायंबर रुद्र करंदीकर व किया रेवणकर, क्रीडा छायाचित्रकार नितीन खानोलकर, अल्ट्रा सायकलिंग स्पर्धेतील विजेते प्रशांत व मेधा जोग यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. जयंत भावे यांनी सूत्रसंचालन केले.

अमितेश कुमार म्हणाले, “विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने योगदान देणे आवश्यक आहे. ‘फिट इंडिया’च्या माध्यमातून नागरिकांनी आरोग्य आणि तंदुरुस्तीला प्राधान्य द्यावे, तसेच पर्यावरण संवर्धनासाठीही सक्रिय सहभाग नोंदवावा. देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा उभारणीवर भर देतानाच, येत्या काळात सायकल प्लॅनच्या माध्यमातून सायकल संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सामान्य नागरिक, महिला सुरक्षेसाठी कटिबद्ध आहोत.”

प्रास्ताविकात प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, आदरणीय मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित ‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे यंदाचे सातवे वर्ष आहे. आरोग्यपूर्ण जीवनासाठी, प्रदूषणमुक्त पुण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. देशाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय घेऊन मोदीजी काम करीत आहेत. त्यांच्या या उदात्त कार्याला कृतज्ञता म्हणून हा उपक्रम राबविण्यात येतो आहे.”

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×