Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

पुण्यात पीएमपी प्रवासी महिलांचे दागिने चोरले

पुण्यात पीएमपी प्रवासी महिलांचे दागिने चोरले

गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा डाव; आळंदी रस्ता आणि महापालिका भवन परिसरात दोन महिलांचे दागिने लंपास

marathinews24.com

पुणे – पीएमपी प्रवासी महिलांकडील दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली. आळंदी रस्ता, तसेच महापालिका भवन बसस्थानक परिसरात या घटना घडल्या. याबाबत एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांवर हल्ला करुन पसार झालेले चोरटे जेरबंद – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४७ वर्षीय महिला मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यातील रहिवासी आहेत. त्या कामानिमित्त पुण्यात आल्या होत्या. शुक्रवारी (२१ ऑगस्ट) सकाळी नऊच्या सुमारास त्या पीएमपी बसने प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी होती. चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दीड लाखांचे मंगळसूत्र चोरले. पोलीस उपनिरीक्षक रेवले तपास करत आहेत.

दुसऱ्या एका घटनेत महापालिका भवन परिसरातील पीएमपी थांब्याजवळ प्रवासी महिलेच्या हातातील ९० हजारांची बांगडी चोरून नेली. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या वडगाव शेरीत राहायला आहेत. २० ऑगस्ट रोजी त्या महापालिका भवन परिसरातील बस थांब्यावर थांबल्या होत्या. पीएमपी बसमध्ये प्रवेश करताना चोरट्याने हातातील सोन्याची बांगडी चोरुन नेली.चोरट्याने कटरचा वापर करुन बांगडी तोडल्याची शक्यता असून, पोलीस कर्मचारी पवार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×