काही त्रुटी आढळुन आल्याने गुंतवणूकदारांना पुणे पोलिसांनी केले आवाहन
marathinews24.com
पुणे – डी. एस. के मध्ये गुंतवणुक केलेल्या गुंतवणुकदार आर्थिक गुन्हे शाखेने आवाहन केले आहे की, लिस्ट ‘बी’ व ‘सी’ मध्ये काही त्रुटी आढळुन आलेल्या आहेत. ही लिस्ट न्यायालयात सादर करण्यापूर्वी यामध्ये दुरस्ती करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी दिलेल्या तारखांना शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात हजर राहून त्रुटी दुरुस्त करुण घ्याव्यात.
आर्थिक गुन्हे शाखेने ‘ए’ लिस्टमध्ये डी. एस. के यांचे कार्यालयातील संगणाकतुन प्राप्त केलेली ठेवीदारांची यादी केली आहे. तर ‘बी’ लिस्टमध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडे गुंतवणीकी संबंधाचे माहिती व कागदपत्रे सादर ठेवीदारांची यादी आहे. आणि ‘सी’ लिस्ट
शॉर्ट टर्म लोन धारकांच्या यादी आहे. यादीमध्ये खालीलप्रमाणे त्रुटी निदर्शनास आलेल्या आहेत.
काही ठेवीदारांनी आवश्यक कागदपत्रे (ठेवीच्या पावत्या, स्वतःच्या बँक खात्याचा कॅन्सल चेक, आधारकार्ड फोटोकॉपी,) सादर केलेली नाही. काही ठेवीदारांची ठेव रक्कम चुकीची नोंद झालेली आहे (रक्कम कमी किंवा जास्त) तसेच ज्या ठेवीदारांच्या ‘ठेवींच्या मुदती संपल्या होत्या आणि त्याच पावतीच्या ऐवजी त्यांना नवीन पावती तेवढ्याच रकमेची मिळाली होती. अशा ठेवींदारांनी कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेकडे जमा करताना फक्त नवीन पावत्या लावायला पाहिजे होत्या. परंतू जुनी व नवीन दोन्ही पावत्या दिल्यामुळे रक्कम दोनदा दर्शविली गेली आहे.
काही ठेवीदारांचे मोबाईल नंबर, बैंक खाते क्रमांक चुकीचे नोंद झालेली आहे. याची माहिती खालील डी. एस. के पार्टनरशिप फर्म मध्ये ठेवी ठेवलेल्या ठेवीदारांच्या संबंधाचे असणार आहे. म्हणजेच डी एस कुलकर्णी ॲन्ड असोसियट्स, डी एस कुलकर्णी ब्रदर्स डी एस कुलकर्णी ॲन्ड सन्स, डी एस के ॲन्ड सन्स, डी एस के ॲन्ड असो., डी एस के कंन्स्ट्रक्शन, डी एस के एंटसप्राझेस, डी एस कुलकणी ॲन्ड कंपनी (कमी कालावधीसाठी अर्ज किंवा शॉर्ट टर्म लोन पैसे घेतलेली कंपनी) यामुळे गुंतवणूकादरांनी २९ मे २०२५ ते ३० मे २०२५ पर्यंत आपली सर्व मूळ कागद पत्र घेऊन आणि फोटो कॉपी घेऊन दाखल करणे आवश्यक आहे. ज्यांचे नाव वरील दोन यादी मध्ये नाही आणि डीएसके एमपीआयडी फिक्स डिपॉझिट होल्डर यादी मध्ये आहे, त्यांनी २ जून २०२५ पासून ७ जून २०२५ पर्यंत येऊन कागद पत्र दाखल करावीत.
डीएसकेडीएल ही पब्लीक लिमिटेड कंपनी आहे. या मधील मुदत ठेवी ज्या गुंतवणुकदारांनी गुंतवणुक केल्या आहेत त्यांची नावे एनसीएलटी कोर्ट यांचेकडे पाठविण्यात आलेली असल्याने त्यांची माहिती स्विकारली जाणार नाही. ज्यांच्या नावे मुदत ठेव आहेत आणि त्या व्यक्तीचे निधन किंवा मयत असतील तर त्यांनी वारसाची नोंद असलेले कागद पत्र, मृत्यू दाखला, कुटुंबातील ईतर सदस्यचे संमती पत्र, मयत वारासदारांचे आधार कार्ड आणि सर्व वारासदारांचे फोटो द्यावेत.
ज्या लोकांची माहिती हि शंभर टक्के अचूक आहे आणि त्यांनी पूर्ण कागद पत्र आर्थिक गुन्हे शाखा पुणे येथे जमा केले आहेत त्यांनी परत यायची गरज नाही. ज्या लोकांचे यादी मध्ये काही त्रुटी उदाहरणार्थ नावाचे स्पेलिंग चुकले, मोबाईल नंबर बदलला आहे किंवा चुकला आहे, मुदत ठेव ची माहिती बरोबर नाही, रक्कम चुकली आहे, बँकेची माहिती चुकली आहे किंवा बदलायची आहे किंवा कागद पत्र जमा करून ही यादी मध्ये नावे आलेले नाही शक्यतो अशाच लोकांनी यायचे आहे.
‘ए’ लिस्ट चा आधार घेवून ‘बी’ व ‘सी’ या लिस्टमध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. दुरुस्त केलेल्या लिस्ट प्रसिध्द केल्या जातील. दुरुस्त्या केलेल्या अंतिम लिस्ट २० जून २०२५ नंतर न्यायालयात सादर केल्या जातील अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस आयुक्तांनी दिली आहे.
दिनांक १५ मे रोजी १ ते ५०० ठेवीदार ठेवी क्रमांक असलेल्यांची कागदपत्रे शिवाजीनगर मुख्यालयात स्विकारण्यात येणार आहे. यानंतर २९ मे पर्यंत दररोज त्या पुढील ५०० क्रमांकांची कागदपत्रे स्विकारली जाणार आहेत. सकाळी १०.३० ते सायंकाळी सहा पर्यंत ही कागदपत्रे स्विकारली जातील