Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे 'अतिउत्कृष्ट सेवा पदक'

विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून विशेष सत्कार!

marathinews24.com

पुणे – पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना त्यांच्या उल्लेखनीय आणि कर्तव्यदक्ष सेवेबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मानाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे. या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल पुणे शहरातील विविध क्षेत्रांतील प्रमुख लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने पोलीस आयुक्तांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. दरम्यान यावेळी उत्कृष्ट सेवेबद्दल सहपोलिस आयुक्त संजय दराडे यांचाही शिष्टमंडळाने विशेष सत्कार केला.

हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदम – सविस्तर बातमी 

पुणे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून अमितेश कुमार यांनी शहरातील गुन्हेगारी नियंत्रण, अवैध धंद्यांवरील धडक कारवाई आणि सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण या त्रिसूत्रीवर विशेष भर दिला आहे. त्यांच्या याच गतिमान आणि धाडसी कार्यपद्धतीमुळे पुणे शहर आणि पोलीस दलाचा लौकिक अत्यंत वाढल्याची भावना या सत्कार प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली.

या विशेष सत्कार प्रसंगी पुणे शहराचे माजी नगरसेवक अय्युब शेख, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, शिवसेना नेते अजय भोसले, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य बाळासाहेब जानराव, रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे राहुल डंबाळे, शिवसेनेचे मिलिंद आहिरे तसेच सामाजिक कार्यकर्ते आबिद सय्यद आणि इतर सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

उपस्थित सर्व मान्यवरांनी आयुक्त अमितेश कुमार यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×