Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune Police News : मोटार चालकाला धमकावून ५ हजार मागणारा पोलीस अटकेत

कारवाई आणि मोटार जप्त करण्याची भीती दाखवून पैशांची मागणी; वारजे पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – कारवाईची भीती दाखवून मोटार चालकाकडे पाच हजार रुपयांची मागणी करणाऱ्या पोलीस शिपायाला वारजे पोलिसांनी अटक केली. बाबूराव पोपट ढोले असे अटक करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. याबाबत मोटार चालक शिवकुमार बच्चूलाल सरोज (वय २३, रा. अचलपूर, प्रयागराज, उत्तर प्रदेश) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यातील अपघातांत पादचारी ज्येष्ठ महिलांचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सराजे हे गुरुवारी (२९ ऑक्टोबर) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन निघाले होते. त्या वेळी डुक्करखिंड परिसरात पोलीस शिपाई ढोले याने मोटार अडविली. मोटार चालक सरोज याला धमकावले. कारवाईची भीती दाखविली, तसेच माेटार जप्त करण्याची धमकी दिली. सराेज याला धमकावून पोलीस शिपाई काळे याने पाच हजार रुपयांची मागणी केली. घाबरलेल्या सरोज यांनी वारजे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

पोलिसांनी काळे याला ताब्यात घेतले. चौकशीत मोटार चालकाला धमकावून पैशांची मागणी केल्याचे उघडकीस आल्यानंतर अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर रायगोंडा तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×