नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तासाठी जात असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या वाहनाचा मार्ग अडवून अरेरावी केल्याचा आरोप
marathinews24.com
पुणे – Pune Police News : नवरात्रोत्सवानिमित्त मंडळांना भेटी देण्यासाठी जात असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या शासकीय वाहनासमोर दुचाकी आडवी जाब विचारणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना १७ ऑक्टोबरला वाघोलीत घडली. त्र्यंबक नारायण कांबळे (रा. साळुंखे वस्ती, कोलवडी, ता. हवेली) याच्यावर वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस शिपाई प्रशांत भगवान धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना केसनंद रोडवरील जोगेश्वरी स्कूलजवळ रात्री सव्वाआठ वाजता घडली.
वैमनस्यातून एकावर ब्लेडने वार करणारा अटकेत – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड हे १७ ऑक्टोबरला रात्री आठ वाजता शासकीय वाहनातून नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तासाठी मंडळांना भेटी देत होते. (Pune Police News) त्यावेळी आरोपी कांबळे ने एमएच १२ व्हाय २८९६ क्रमांकाची दुचाकी शासकीय वाहनासमोर आडवी लावली. वाहनाचा मार्ग अडवून त्याने पोलिसांशी अरेरावीची भाषा वापरली. उद्धट वर्तन केल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
आरोपी त्र्यंबक कांबळे हा रिल्स स्टार असून १७ ऑक्टोबरला वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड हे त्यांच्या वाहनातून जात होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या त्र्यंबक कांबळे याने गाडी चालवत असलेल्या अमंलदाराला एकेरी भाषेत आवाज दिला. ये बेल्ट लावला नाही का गाडी बाजूला घे, असे म्हणत उद्घट वर्तन केले. पोलीस हे त्यांच्या हद्दीतील नवरात्रोत्सवानिमित्त मंडळांना भेटी देण्यासाठी जात असताना आरोपीने सरकारी कामात अडथळला आणला. दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड हे गाडीतून खाली उतरून आरोपीकडे जाईपर्यंत त्याने व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल केला.




















