Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

तब्बल ३ कोटी २६ लाखांचा मुद्देमाल मालकांच्या स्वाधीन

तब्बल ३ कोटी २६ लाखांचा मुद्देमाल मालकांच्या स्वाधीन

२९४ गुन्ह्यांतील मालमत्ता केली परत

marathinews24.com

पुणे – चोरीला गेलेली मालमत्ता परत मिळण्याची आशा सोडलेल्या नागरिकांना पुणे पोलिसांनी मोठा दिलासा दिला आहे. परिमंडळ तीनमधील विविध पोलिस ठाण्यांच्या पथकांनी तपास, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तब्बल २९४ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला ३ कोटी २६ लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांच्या स्वाधीन केला.

गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण खपवून घेणार नाही – पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा – सविस्तर बातमी 

लोकसहभागातून परिमंडळ तीनमध्ये उभारण्यात आलेल्‍या ९७१ हून अधिक सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यांचे पोलिस आयुक्‍त अमितेश कुमार यांच्‍याहस्‍ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी सह पोलिस आयुक्‍त संजय दराडे, अपर पोलिस पोलिस आयुक्‍त राजेश बनसोडे, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, पोलिस उपायुक्‍त सागर कवडे तसेच परिमंडळ तीन मधील पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अमंलदार उपस्‍थित होते. सिंहगड रस्ता, कोथरूड, वारजे, उत्तमनगर, अलंकार, नांदेड सिटी आणि नऱ्हे पोलिस ठाण्यांच्या पथकांनी विविध गुन्ह्यांचा तपास करून हा मुद्देमाल हस्तगत केला.

पोलिसांनी रात्रंदिवस तपास, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने गुन्ह्यांचा छडा लावत मालमत्ता जप्त केली. या कारवाईत अलंकार पोलिस ठाण्यातील २६ गुन्ह्यांमधून १ कोटी २४ लाख रुपये, वारजे पोलिस ठाण्यातील ४६ गुन्ह्यांमधून ७७ लाख ८९ हजार रुपये, कोथरूड पोलिस ठाण्यातील २४ गुन्ह्यांमधून ४१ लाख १४ हजार रुपये, सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यातील ४५ गुन्ह्यांमधून ३१ लाख ६३ हजार रुपये, नांदेड सिटीतील ३४ गुन्ह्यांमधून २२ लाख ५० हजार रुपये, नऱ्हेतील ७ गुन्ह्यांमधून ७ लाख ९६ हजार रुपये, तर उत्तमनगर पोलिस ठाण्यातील २१ गुन्ह्यांमधून २१ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. दरम्यान, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी परिमंडळ तीनमध्ये नागरिक, व्यापारी आणि दुकानदारांच्या सहकार्याने ९७१हून अधिक आधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आले आहे. या कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासह गुन्ह्यांच्या तपासाला मोठी मदत होत आहे.

‘तिसरा डोळा’ ठरतोय पोलिसांचा साथीदार!

परिमंडळ-३मधील विविध भागांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कायदा-सुव्यवस्था राखण्यास आणि गुन्हे उघडकीस आणण्यास मदत होत आहे. नागरिक, व्यापारी व दुकानदारांच्या सहकार्यामुळे हे जाळे उभारण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×