राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
marathinews24.com
पुणे – पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची बदली केली आहे. राज्य शासनाने शुक्रवारी दि. १६ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार पुण्यातील तीन अपर पोलिस आयुक्तांची अन्य ठिकाणी बदली केली. यावेळी पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक पंकज देशमुख यांची पुणे शहर पोलिस दलात अपर पोलिस आयुक्तपदी बदली केली. गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांची बृहन्मुंबई येथे गुन्हे शाखेच्या अपर पोलिस आयुक्तपदी, तर अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया यांची अमरावती पोलिस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.
अपर आयुक्त प्रवीण कुमार पाटील यांची नागपूर येथे अपर पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली. या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी (दि. १६) रात्री काढण्यात आले. त्यानुसार पंकज देशमुख – पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण ते अपर पोलिस आयुक्त, पुणे शहर, संजय बी. पाटील – अपर पोलिस आयुक्त, नागपूर ते अपर पोलिस आयुक्त, पुणे शहर, राजेश बनसोडे – पोलिस अधीक्षक, बिनतारी, पुणे ते अपर पोलिस आयुक्त, पुणे शहर, अमोघ गावकर – पोलिस उपायुक्त, प्रतिबंध, बृहन्मुंबई ते पोलिस उप महानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, प्रशासन, पुणे, जी. श्रीधर – पोलिस उप महानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग ते पोलिस उप महानिरीक्षक, पोलिस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग, पुणे, विजय मगर – प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, लातूर ते पोलिस उप महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस बल, पुणे याठिकाणी बदली झाली आहे.