विश्रांतवाडी पोलिसांकडून सराइतासह साथीदारांवर गुन्हा
marathinews24.com
पुणे – पादचारी महिलेला अडवून भर चौकात तिचा विनयभंग केल्याची घटना विश्रांतवाडीतील कळस भागात घडली. याप्रकरणी सराइतासह तिघांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सराइत गुन्हेगार संकेत सावंत (वय २८, रा. योग सोसायटी, कळस, आळंदी रस्ता, विश्रांतवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दुचाकी लावण्याच्या वादातून तिघांवर हल्ला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विश्रांतवाडीत राहायला असून, आळंदी रस्त्यावर कळस येथे राहणाऱ्या नातेवाईकांकडे निघाली होती. त्यावेळी दुचाकीवर बसलेल्या तरुणांनी महिलेची छेड काढली. त्यावेळी सराइत गु्न्हेगार संकेत सावंत तेथे होता. ‘ मी या भागातला दादा आहे. तू खूप सुंदर दिसते’, असे म्हणून तिचा विनयभंग केला. सावंत याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांनी अश्लील शब्दात महिलेशी संवाद साधला. घटनेनंतर महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सराइत गुन्हेगार संकेत सावंत याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
टवाळखोरांकडून महिला, तरुणींची छेड काढण्याचे प्रकार वाढीस
टवाळखोरांकडून महिला, तरुणींची छेड काढण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. तरुणींचा पाठलाग करुन त्यांची छेड काढली जाते. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी सडक सख्याहरींविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.