Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ महिलेची फसवणूक

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ महिलेची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सोशल मीडियावर शेअर बाजारातील गुंतवणूक विषयक जाहिरात पाहिल्यानंतर मोठ्या परताव्याच्या आमिषापोटी एका ज्येष्ठ महिलेने मैत्रिणीचे दागिने मोडून आठ लाख रुपयांची गुंतवणूक केली. सायबर चोरट्यांनी गुंतवणुकीवर ७४ लाख रुपयांचा परतावा मिळाल्याचे भासविले. प्रत्यक्षात महिलेला परतावा आणि गुंतविलेली रक्कम परत देण्यात आली. परताव्याचे आमिष महिलेला महागात पडल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ६५ वर्षीय महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने महिलेची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला वारजे भागातील अतुलनगर भागात राहायला आहेत. ९ सप्टेंबरला फिर्यादी महिलेच्या मैत्रिणीने समाज माध्यमात शेअर बाजारातील गुंतवणूकविषयक जाहिरात पाहिली होती. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी जाहिरातीतून दाखविले होते.

त्यानंतर फिर्यादी महिलेच्या मैत्रिणीने जाहिरातीतील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला एक ॲप मोबाइलमध्ये घेण्यास सांगितले. चोरट्यांच्या खात्यात महिलेच्या मैत्रिणीने पैसे जमा केले. तेव्हा ॲपमधील माहितीनुसार महिलेला मोठा परतावा मिळाल्याचे दिसून आले. चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढले. शेअर बाजारात आणखी रक्कम गुंतविल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखविले.

मैत्रिणीकडे पैसे नसल्याने तिने फिर्यादी महिलेकडे पैसे मागितले. त्यानंतर फिर्यादी महिलेने शहरातील प्रसिद्ध सराफी पेढीत जाऊन दागिने मोडले. मैत्रिणीला ९ लाख रुपये दिले. मैत्रिणीने ऑनलाइन पद्धतीने चोरट्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली. तेव्हा तिला गुंतवणुकीवर ७४ लाख रुपये परताव्यापोटी मिळाल्याचे भासविण्यात आले. परताव्याची रक्कम तिने काढण्याचा प्रयत्न केला. महिलेने चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, चोरट्यांनी टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×