Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune Solapur Highway Accident : उड्डाणपुलाच्या कामावेळी मातीचा ढिगारा कोसळला; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune Solapur Highway Accident

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून चौकशीचे निर्देश

marathinews24.com

पुणे – Pune Solapur Highway Accident : जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील राजवडीत पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ साईडपट्टीच्या भरावाचे काम सुरू असताना माती-मुरुमाचा ढिगारा कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला असून, एक मजूर जखमी झाला आहे. जखमी मजुराला तातडीने बाहेर काढून इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले असून, घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

पुण्यातील नाना पेठ, केशवनगरात घरफोडी;लाखोंचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी 

शुक्रवारी (दि.३०) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. उड्डाण पुलाजवळ साईडपट्टीच्या भरावाचे काम सुरू असताना अचानक माती-मुरुमाचा ढिगारा कोसळला. त्यावेळी घटनास्थळी तीन मजूर काम करीत होते. त्यापैकी एका मजुराने प्रसंगावधान राखून स्वतःची सुटका करून घेतली. (Pune Solapur Highway Accident) उर्वरित दोन मजुरांपैकी एकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, तर एका मजुराचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचाव व मदतकार्य हाती घेऊन जखमी मजुराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रशासनाकडून घटनेच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×