दारू आणून न दिल्याने केला खून
marathinews24.com
पुणे – दारू आणून न दिल्याच्या रागातून तरूणाच्या खूनप्रकरणात समर्थ पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी तरुणाचे डोके भिंतीवर आपटून त्याचा खून केला होता. ही घटना ३ मे ला रात्री साडे आठच्या सुमारास भवानी पेठेतील काशेवाडीत घडली. गोपाल आचार्य (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दानिश अली शेख उर्फ डॅनी (वय २१) आणि अमीर महमंद शेख (वय ३८, दोघेही रा. काशेवाडी) यांच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जयराम आचार्य ( वय ५१, रा. काशेवाडी) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
ट्रकला धडकल्यामुळे दुचाकीस्वार ठार – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयराम आचार्य हे कुटूंबियासह काशेवाडीत राहायला असून, त्यांचा मुलगा गोपाल हा ४ मे रोजी काशेवाडीत होता. त्यावेळी वस्तीवरील आरोपी अमिरने त्याला दारू आणण्यासाठी सांगितले होते. मात्र, गोपालने त्याला नकार दिला होता. त्याच रागातून आरोपी दानिशने गोपालला घराबाहेर बोलावून घेत तू माझ्या चाचाला दारू आणून का दिली नाही, अशी विचारणा करून त्याचे डोके भिंतीवर आपटले. आरोपी दानिश व अमीर यांनी गोपालला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या गोपालला वडील जयराम यांनी तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, मारहाणीत गोपालच्या डोक्यात रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना खडक पोलिसांनी अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक ऋतूजा जाधव तपास करीत आहेत.