Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

पुण्यात दुचाकी चोरणारा अटकेत; अल्पवयीन ताब्यात

पुण्यात दुचाकी चोरणारा अटकेत; अल्पवयीन ताब्यात

चोरट्यांकडून १४ दुचाकी जप्त

marathinews24.com

पुणे – शहरातील टिळक रस्ता परिसरातून दुचाकी चोरुन पसार झालेल्या चोरट्यासह अल्पवयीन साथीदाराला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी एका दुचाकी चोरट्याला अटक केली असून, त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराचा शाेध सुरू आहे. चोरट्यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातून दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.कृष्णा चंदक्रांत शेळके (वय २६, रा. माळेगाव, ता. अहदमपूर, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेळकेचा साथीदार वैभव सांगुळे (रा. सुतारदरा, कोथरूड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात दाद कोणाला मागायची, भाजप महिला कार्यकर्तीची हतबलता – सविस्तर बातमी 

टिळक रस्ता परिसरातील चिमणबाग परिसरातून २३ जून रोजी एकाची दुचाकी चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा विश्रामबाग पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. तपासात दुचाकी चोरणारे चाेरटे नारायण पेठेत थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून एकाला पकडले. अंधारात त्याच्या बरोबर असलेला साथीदार पसार झाला. चौकशीत ताब्यात घेण्यात आलेला चोरटा अल्पवयीन असल्याची महिती मिळाली. तो कोथरूडमधील सुतारदरा परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी त्याच्या आत्यासमक्ष चैाकशी केली. तेव्हा वैभव सांगुळे आणि कृष्णा शेळके यांच्याबरोबर पुणे शहरातून दुचाकी चोरल्याची कबुली अल्पवयीनाने दिली. त्यानंतर पोलिसांनी सांगुळे आणि शेळके यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. सांगुळे पसार झाला होता. त्याच्याबरोबर असलेला साथीदार शेळके हा लातूर परिसरात राहत असल्याचे समजले. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांचे पथक लातूरला रवाना झाले. शेळके याला ताब्यात घेण्यात आले. अल्पवयीन आणि साथीदार शेळके यांच्याकडून दहा लाख रुपयांच्या १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या. शेळके, सांगुळे आणि अल्पवयीनाने पुणे शहर आणि जिल्ह्यातून आणखी काही दुचाकी चोरल्याचा संशय असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास भिंगारदिवे, रमेश लाहिगुडे, सहायक निरीक्षक उमेश कारके, सत्यवान गेंड, मेहबूब माेकाशी, अमोल भोसले, नितीन मुंढे, महेश कदम, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, शशिकांत दरेकर, कैलास डुकरे यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×