Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune University : पुणे विद्यापीठात मुलींच्या वसतिगृहात शिरणाऱ्या दोन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थिनींच्या वसतिगृहात शिरणाऱ्या दोन विद्यार्थ्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रमोद राठोड, ओंकार गोरे (दोघे सध्या रा. मुलांचे वसतिगृह, शिक्षणशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विद्यापीठातील सुरक्षारक्षक संपत पाटील (वय ५१) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ११ ऑक्टोबर रोजी रात्री अकराच्या सुमारास आरोपी विद्यार्थी मुलींच्या वसतिगृहात शिरले.

पुण्यात किराणा माल व्यावसायिकाकडे मागितली ५ लाखांची खंडणी; पोलिसासह दोघांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

मुलींच्या वसतिगृहात प्रवेश करण्यास बंदी आहे. रात्रीच्या वेळी दोघे जण बेकायदा मुलींच्या वसतिगृहात शिरले. आरोपींनी मुलींच्या वसतिगृहात घुसखोरी केली, असे सुरक्षारक्षक पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत विद्यापीठातील सुरक्षारक्षकांनी तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी भेट दिली. सुरक्षारक्षकाने दिलेल्या तक्रारीनंतर भारतीय न्याय संहिता कलम ३२९ (१) (बेकायदा प्रवेश करुन धमकाविणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक उमेश कोळी तपास करत आहेत.

घटनेनंतर वसतिगृहातील विद्यार्थिनीशी दोन विद्यार्थ्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला. विद्यार्थिनींनी सोमवारी पहाटे चतु:शृंगी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते. दिला. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विभागातील, वसतिगृहातील प्रवेश रद्द केल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले, तसेच या घटनेची दखल घेऊन वसतिगृहप्रमुखांनी या प्रकरणी राजीनामा दिला. विद्यापीठातच शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थिनीची अनुचित चौकशी करून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या अनुषंगाने विद्यार्थिनींनी कुलगुरूंची भेट घेऊन कठोर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×