Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

दावे-हरकती कालावधीत पुणे जिल्ह्यात २१ हजार ५५५ अर्ज प्राप्त

दावे-हरकती कालावधीत पुणे जिल्ह्यात २१ हजार ५५५ अर्ज प्राप्त

मतदार यादीत नाव नोंदणी, वगळणे व तपशीलातील दुरुस्तीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत संधी

marathinews24.com

पुणे – विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत सुरू असलेल्या दावे व हरकतींच्या कालावधीत ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुणे जिल्ह्यात विविध प्रकारचे एकूण २१ हजार ५५५ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये फॉर्म ६ चे १२ हजार ४७२, फॉर्म ७ चे ६८१ आणि फॉर्म ८ चे ८ हजार ३६८ अर्ज आहेत.

दिव्यांगांसाठी ‘पर्पल डॉट्स’ उपक्रमाची पुणे जिल्ह्यात अंमलबजावणी – सविस्तर बातमी 

मतदार यादीत नवीन मतदार म्हणून नाव नोंदविणे, नाव वगळण्याबाबत हरकत नोंदविणे तसेच मतदार यादीतील नाव, पत्ता अथवा अन्य तपशीलात दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. पात्र नागरिकांना ही प्रक्रिया ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे.

नवीन मतदार म्हणून नाव नोंदविण्यासाठी फॉर्म ६, मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी किंवा त्याबाबत हरकत नोंदविण्यासाठी फॉर्म ७, तर नाव, पत्ता व अन्य तपशीलात दुरुस्तीसाठी फॉर्म ८ भरता येईल. ऑनलाइन अर्जासाठी भारत निवडणूक आयोगाच्या voters.eci.in या संकेतस्थळाचा वापर करता येईल. ऑफलाइन अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे सादर करता येणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी मतदार यादी तपासून आपले नाव समाविष्ट नसल्यास किंवा मतदार यादीतील तपशीलात दुरुस्ती आवश्यक असल्यास ३० सप्टेंबरपूर्वी आवश्यक अर्ज दाखल करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×