Breking News
Pune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवालFodder Shortage Maharashtra 2026 : चारा टंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभाग सज्जMPSC Group C Exam 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क परीक्षेसाठी पदसंख्येत वाढJyoti Savitri School Khanwadi : महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे विशेष : परिवर्तनाचा नवा दीप : ‘ज्योती सावित्री’ शाळा!Birsa Munda Seva Saptah 2026 : भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभMahajyoti Pune News : महाज्योतीच्या ५१ विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी भरारी!Wagholi Traffic News : वाघोली-लोहगाव चौक रस्त्यावर एकेरी वाहतूक

Pune Voter List Revision 2026 : मतदार यादी निरीक्षकांचा १६ ऑक्टोबर रोजी पुणे जिल्हा दौरा

Pune Voter Registration Campaign

मतदार नोंदणीसंदर्भातील तक्रारी दाखल करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे –  Pune Voter List Revision 2026 : दि. १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी सुधारणांबाबत उपाययोजना सुचविणे व त्यासंदर्भातील अहवाल निवडणूक आयोगाला सादर करण्यासाठी विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांची ‘मतदार यादी निरीक्षक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

समान भाषा उपशीर्षकांमुळे भाषा शिक्षणाला गती – सविस्तर बातमी 

या कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी, दावे निकाली काढण्याचा कालावधी आणि मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धीच्या वेळी अशा तीन टप्प्यांत मतदार यादी निरीक्षकांकडून पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानुसार मतदार यादी निरीक्षक शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे जिल्ह्याला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान दुपारी ३.३० वाजता मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावरील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

मतदार नोंदणी आणि मतदार यादीसंदर्भातील नागरिकांच्या तक्रारी दाखल करून घेण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या तक्रारी व अडचणी मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. (Pune Voter List Revision 2026) तसेच, मतदार यादी निरीक्षकांच्या भेटीव्यतिरिक्त इतर कालावधीतही मतदार नोंदणीसंदर्भातील तक्रारी भारत निवडणूक आयोगाच्या NGRS पोर्टलवर तसेच जिल्हास्तरीय कॉल सेंटरच्या १९५० या दूरध्वनी क्रमांकावर नोंदविता येणार आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×