Breking News
Pune Mahalakshmi Temple Gold Saree : सुवर्णवस्त्रांनी सजली सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीMakarand Anaspure : विद्यार्थीपण आहे तोपर्यंतच जगण्याला अर्थ- मकरंद अनासपुरेMLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणका

Marathi Subtitles : समान भाषा उपशीर्षकांमुळे भाषा शिक्षणाला गती -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

दूरदर्शन येथे ‘मराठी समान भाषा उपशीर्षक केंद्रा’चा शुभारंभ

marathinews24.com

मुंबई –  दृकश्राव्य माध्यमांमध्ये समान भाषेतील उपशीर्षके (subtitles) उपलब्ध झाल्यामुळे भाषेचे आकलन आणि वाचन वाढण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे निश्चितच भाषा शिक्षणाला गती येईल, असा विश्वास माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केला.

वरळी येथील दूरदर्शन केंद्रात प्लॅनेट रीड ‘मराठी समान भाषा उपशीर्षक केंद्रा’चा शुभारंभ सिंह यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. त्यानंतर दूरदर्शन केंद्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दूरदर्शन केंद्र मुंबईचे उपसंचालक (अभियांत्रिकी) हेमंत देसाई, गणेश अय्यर आणि आयआयटी दिल्लीचे सहाय्यक प्राध्यापक तथा ‘बिलियन रीडर्स’चे प्रमुख प्रा. ब्रिज कोठारी उपस्थित होते.

श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मान – सविस्तर बातमी

उपशीर्षक उपक्रम थोडक्यात

या उपक्रमांतर्गत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील मराठी मनोरंजन कार्यक्रमांमध्ये मराठी भाषेतून देवनागरी लिपीत उपशीर्षके (subtitling) देण्यात येणार आहेत. यामुळे कार्यक्रम पाहणाऱ्या प्रत्येकाचे मराठी वाचन होणार आहे. मराठी भाषा वाचनाला यामुळे चालना मिळेल. विद्यार्थी तसेच श्रवणदिव्यांगांना याचा मोठा लाभ होईल. अशा प्रकारे प्रादेशिक भाषेतून उपशीर्षके देण्याच्या या उपक्रमाची सुरुवात सर्वप्रथम महाराष्ट्रातून झाली आहे.

या उपक्रमाची सुरुवात राज्य शासन, प्रसार भारती, आयआयटी दिल्ली आणि प्लॅनेट रीड यांच्या वतीने करण्यात आली आहे.

प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले, या अभिनव उपक्रमामुळे श्रवणदिव्यांग व्यक्तींनाही कथा, कथानक आणि पटकथेतील घडामोडी समजून घेता येतील. लिखित शब्दाचे महत्व जपणाऱ्या या उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्रातून होत आहे, ही आनंदाची बाब आहे.

मराठी भाषा अत्यंत समृद्ध आहे. दैनंदिन व्यवहारात भाषा बोलणाऱ्या अनेकांना लिखित भाषेचे संपूर्ण विश्व उपलब्ध होत नाही. त्यामुळे लिखित शब्दाचे महत्त्व हरवू देता कामा नये. समान भाषेतील उपशीर्षके हा त्यासाठीचा सोपा आणि परिणामकारक तंत्रज्ञानाधारित उपाय आहे, असेही सिंह म्हणाले.

नागरिकांचा पडद्यावरील वेळ वाढत असताना त्याच पडद्यावर समान भाषेतील उपशीर्षके उपलब्ध झाल्यास आशयाच्या संदर्भासह भाषा सहजपणे शिकता येते. उपशीर्षकांमुळे प्रेक्षकांचे भाषेशी नाते अधिक दृढ होऊन भाषेचे आकलनही वाढते. विशेषतः श्रवणदिव्यांग व्यक्तींना पडद्यावरील कथा आणि घटनाक्रम समजण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असेही सिंह यांनी सांगितले.

प्रा. ब्रिज कोठारी यांनी प्रास्ताविकात मराठी भाषेचा प्रसार आणि वाचनवृद्धीविषयी माहिती दिली. संतोष जाधव यांनी उपशीर्षक प्रक्रियेचे सादरीकरण केले, तर देवेश कुमार यांनी ‘प्लॅनेट रीड’ आणि भाषा उपशीर्षक उपक्रमाची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीनता घाग आणि पूर्वा कर्वे यांनी केले. चेतना पवार यांनी आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×