Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune Woman Suicide Case : छळामुळे व्यावसायिकाच्या सुनेने घेतला गळफास; गुन्हा दाखल

आत्महत्येनंतर नातेवाईकांकडून इमारतीवर दगडफेक

marathinews24.com

पुणे – कौटुंबिक छळामुळे व्यावसायिक बाळासाहेब झांबरे यांच्या सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २ ) सकाळी साडे अकरा वाजता घडली. यानंतर संतप्त नातेवाईकांनी मुकुंदनगर भागातील झांबरे पॅलेस परिसरातील इमारतीवर दगडफेक केली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन स्वारगेट पोलिसांनी पती, सासू, सासरे, नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

उद्योजकाची ‘वायप्लस’ सुरक्षा कोणाच्या शिफारशीवरून? – सविस्तर बातमी

पायल अक्षय झांबरे (वय ३४, रा. मंगलमय इमारत, झांबरे पॅलेसजवळ, मुकुंदनगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी पती अक्षय अरविंद झांबरे, सासू मंगल, सासरे अरविंद, नणंद अक्षता निम्हण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत पायल यांचे भाऊ ऋषीकेश रवींद्र पवार (वय ३१, रा. श्रीरामनगर, खेड शिवापूर) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पायल ही अभियंता होती. विवाहानंतर तिचा पती, तसेच सासरकडील नातेवाईकांडून छळ करण्यात आल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप करुन नातेवाईकांनी सोमवारी मुकुंदनगर भागातील झांबरे पॅलेस परिसरातील इमारतीवर दगडफेक केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पायलचा अक्षय याच्याशी १३ मार्च २०१९ रोजी विवाह झाला होता. विवाहात हुंड्यापोटी ५० तोळे सोन्याचे दागिने, २५ लाख रुपये, तसेच विवाहाचा सर्व खर्च असा मिळून ७५ ते ८० लाख रुपये खर्च केला होता.

विवाहानंतर पती, सासू, सासरे, नणंदेने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. माहेरहून पैसे आणण्याची मागणी करुन छळ सुरू केला. आरोपींनी तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केल्याने सोमवारी (२ नाेव्हेंबर) गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×