Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

कृषी व पशूसंवर्धन विभागाच्या, शेतकऱ्यांना थेट लाभाच्या DBT योजना त्वरित सुरू करा

कृषी व पशूसंवर्धन विभागाच्या, शेतकऱ्यांना थेट लाभाच्या DBT योजना त्वरित सुरू करा

सभापती युवराज काकडे यांची मागणी

marathinews24.com

पुणे – जिल्हा परिषद कृषी व पशूसंवर्धन विभागांतर्गत राबवल्या जाणाऱ्या थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजना वेळेत सुरू करणे अत्यंत आवश्यक असून, शेतकरी बांधवांना खरीप व रब्बी हंगामात लागणारी अवजारे, बी-बियाणे आणि इतर निविष्ठा वेळेवर उपलब्ध झाल्यास, ऐन पेरणी किंवा कापणीच्या वेळी याचा लाभ शेतकरी बांधवांना होईल, अशी मागणी, पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशूसंवर्धन सभापती अमोल नलावडे यांच्याकडे, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून बारामती परिसरातील विविध विकासकामांची पाहणी – सविस्तर बातमी 

पुणे जिल्हा परिषद शेतकऱ्यांना कृषी व पशूसंवर्धन विभागांतर्गत 75 % अनुदानावर विद्युत मोटार पंपसेट, प्लास्टिक ताडपत्री, PVC पाईप, भातलावणी यंत्र व बॅटरी स्प्रेयर पंप यांसारखी सुधारीत अवजारे पुरवते. तसेच मुक्त संचार गोठा, मिल्किंग मशीन, मुरघास युनिट, गोठा रबर मॅट, कडबाकुट्टी मशीन आणि एकल महिलांना सुधारित जातीचे तलंगा पक्षी व 2 शेळी वाटप. या गोष्टींचे वाटप शेतकरी बांधवांना होऊन शेतातील व शेतीपूरक कामे अधिक सुलभ होण्यास मदत होते.

पुणे जिल्हा परिषदेची थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजना लवकरात लवकर सुरू करणे संदर्भात सभापती युवराज काकडे यांनी, जिल्हा परिषदेचे कृषी व पशूसंवर्धन समितीचे सभापती अमोल नलावडे यांची भेट घेतली. यावेळी या योजना ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्याचीही मागणी केली. मागील काही वर्षात ही योजना ऑनलाईन असल्याने, अनेक शेतकरी सर्व्हर डाऊन व इतर तांत्रिक अडचणींमुळे लाभापासून वंचित राहिले होते. ही बाबत सभापती काकडे यांनी सभापती नलावडे यांच्या निदर्शनास आणून दिली.

यावेळी कृषी व पशूसंवर्धन सभापती अमोल नलावडे यांनी हवेलीचे सभापती युवराज काकडे यांचे निवेदन प्राप्त होताच, याबाबतच्या हालचाली अधिक गतिमान करत, पुढील आठवड्यापासून DBT योजना सुरू करण्याच्या प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×