पुणेकरांनो, गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार तुमच्या प्रभागाचे उमेदवार

निवडणूकीच्या रिंगणात दीड हजारांवर उमेदवारांवर गुन्हे

marathinews24.com

पुणे – शहराचा विकास करण्याच्या आम्हालाच निवडूण द्या, अशी आर्तहाक देत उमेदवारांनी पुणेकरांना महापालिकेच्या मतदानासाठी साद घातली आहे. प्रत्यक्षात मात्र, संबंधित प्रभागातील उमेदवारांविरूद्ध किती आणि कोणत्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, याची चाचपणी मात्र कोणीही केली नाही. पुणेकरांनो तुमच्या प्रभागाचा विकास करण्याच्या घोषणेखाली गुन्हेगारी प्रवृत्तीच्या राजकारण्यांना तुम्ही मतदान का, याचा विचार करणे आवश्यक आहे. कारण पुणे महापालिकेच्या रिंगणात तब्बल दीड हजारांवर उमेदवारांविरूद्ध विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पुणे पोलिसांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

आवादा कंपनीच्या विरोधात शेतकऱ्याचा संताप – सविस्तर बातमी

पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी शड्डू ठोकले असून, प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आपल्या प्रभागाचा विकास आमच्याच हातात आहे, शहराची कायदा-सुव्यवस्था, कोयता गँगची दहशत, दादागिरी कमी करण्यासाठी आम्ही प्राधान्य देउ अशी आश्वासने अनेकांनी मतदारांना दिली आहेत. प्रत्यक्षात मात्र, बोटावर मोजण्याएवढ्याच उमेदवारांविरूद्ध एकही गुन्हा दाखल नाही. उर्वरित बहुतांश प्रभागातील उमेदवारांचे हात या ना त्या कारणामुळे गुन्हे दाखल होईपर्यंत बरबटले आहेत. संबंधितांच्या क्रुरकृत्यांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचलेली नाही. विशेषतःसत्ताधारी आणि विरोधातील राजकीय पक्षातील अनेक मुरब्बी उमेदवारांनी एकमेकांविरूद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत चकार शब्दही न काढण्याचा संकल्प केला आहे.

शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. निवडणूक लढविण्यापुर्वी आपल्यावर किती गुन्हे दाखल आहेत, याची माहिती मिळविण्यासाठी तब्बल २ हजार ६५० जणांनी पोलिसांच्या विशेष शाखेकडे अर्ज सादर केले होते. त्यापैकी १ हजार ५०० अर्जदारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ६० उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खून, खूनाचा प्रयत्न, अत्याचार, अपहरण, खंडणी यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. दरम्यान, गंभीर गुन्हे दाखल असलेले उमेदवार निवडणुकीत सहभागी असो किंवा त्यांनी माघार घेतलेली असोत अशा संबंधितांविरूद्ध पोलिसांकडून बारकाईने नजर ठेवली जात आहे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा येऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.

कुख्यात गुन्हेगार आंदेकर, मारणे, नायर उमेदवार

महापालिका निवडणूकीत कुख्यात गुन्हेगारांच्या नातलगांनी उमेदवारी अर्ज दाखल करीत नागरिकांना अचंबित केले आहे. नातवाचा खून करणारा कुख्यात बंडू आंदेकरची मुलगी सोनाली आंदेकर, भावजय लक्ष्मी आंदेकर रिंगणात आहे. तर मोक्कातून सुटल्यानंतर शेकडो अलिशान मोटारींची रॅली काढून हवा करणारा कुख्यात गजा मारणे याची पत्नी जयश्रीनेही उमेदवारी अर्ज दाखल करीत जोरदार प्रचार सुरू केला आहे. तसेच खून, खूनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला बापू नायर हा देखील निवडणूकीच्या रिंगणात उभा आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बहुतांश उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) पाठबळ देउन उमेदवारी दिली आहे. त्यामुळे एकीकडे दहशत तर दुसरीकडे पक्षाचे मतदान असे दुहेरी समीकरण जुळवून विजयश्री खेचून आणण्यासाठी गुन्हेगारांनी मतदारांवर फिल्डींग लावली आहे. त्यामुळे नागरिकांनो सांगा तुम्हीच पोलिसांनी कशी कायदा सुव्यवस्था राखायची, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नागरिकांनो आपले उमेदवार मतदानासाठी पात्र आहेत का, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. विशेषतः गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार निवडूण आल्यानंतर त्याचा नेमका फायदा कोणाला होणार आहे, याचा विचार करणे महत्वाचे आहे. प्रभागातील कायदा सुव्यवस्था मजबूत राखण्यासाठी विकासाचा अजेंडा बाळगलेल्या उमेदवारांना मतदान करण्याची मानसिकता बाळगावी. निवडणूक काळात दहशत, दबाव, बळाचा वापर किंवा आर्थिक प्रलोभनाच्या आहारी न जाता मतदान करा. दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकारांचा चांगला वापर करून प्रभागाच्या विकासासाठी निष्कलंक उमेदवाराला निवडूण देण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×