Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

वाघोलीत गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा

८३ हजारांचा मुद्देमाल जप्त; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहराजवळील वाघोली परिसरातील भावडी शिवारात सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून चौघांना रंगेहात पकडले. कारवाईत सुमारे ८३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला असून, संबंधितांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रागीनी पंकज राठोड (वय २१), सुरज धुणई कुमार (वय २०), शिवकुमार राममिलन कुमार (वय २०) आणि पंकज मनोज राठोड (वय २१ रा. सर्व भावडी, ता. हवेली, जि. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुख्यात गुंड बंडू आंदेकरकडून उमेदवारी अर्ज दाखल – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली पोलिस ठाण्याचे तपास पथक २५ डिसेंबरला भावडी रोड परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार मंगेश जाधव यांना भावडी शिवारातील पडीक शेतात, खदानीलगत गुळमिश्रीत रसायनाच्या सहाय्याने गावठी हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ पथक रवाना केले

पोलिस उपनिरीक्षक मनोज बागल यांच्यासह पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. आरोपी आर्थिक फायद्यासाठी हातभट्टी दारू तयार करताना आढळून आले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत, ६३ हजार रुपयांचे अंदाजे १८०० लिटर कच्चे गुळमिश्रीत रसायन, ९ हजारांची ९० लिटर तयार हातभट्टी दारू, १० हजार ५०० रुपयांचे दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, १ हजाराचा पाणी ओढण्याचा पाईप असा ८३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून घटनास्थळीच नष्ट केला. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी नूतन पवार, वाघोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांच्यासह पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×