Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

ओन्ली किंग ऑफ पुणे म्हणत काढली रॅली

ओन्ली किंग ऑफ पुणे म्हणत काढली रॅली

पोलिसांनी गुडघ्यावर धिंड काढून उतरवली टोळीची मस्ती

marathinews24.com

पुणे – ओन्ली किंग ऑफ पुणे म्हणत रॅली काढून सोशल मीडियावर रिल्स व्हायरल करणार्‍या तडीपारासह टोळीला खराडी पोलिसांनी अद्दल घडवली आहे. संबंधित आरोपींना अटक करून पोलिसांनी त्यांची गुडघ्यावर चालवून धिंड काढली आहे. त्यानंतर त्यांचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल करीत पोलिसांनी त्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. निखील मधुकर कांबळे वय २३, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) सुरेश रुपेश गायकवाड ( वय २३), अनुज नितीन मोरे (वय २२) ओमकार अनिल चावरे (वय २४) यांना अटक केली आहे. तसेच इतर ८ ते १० साथीदाराविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात चोरट्यांचा हैदोस, महिलांचे दागिने हिसकावले – सविस्तर बातमी 

लक्ष्मीनगर, येरवडा येथील रेकॉर्डवरील तडीपार आरोपी निखील मधुकर कांबळे (वय २३) याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. मात्र, आदेशाचे उल्लंघन करत त्याने दि. २८ मार्चला सायंकाळी सहा ते दहा वाजण्याच्या सुमारास खराडीतील रक्षक नगर गोल्ड सोसायटी परिसरात साथीदारांसह बेकायदेशीर जमाव जमवला. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी रॅली काढत त्याचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर प्रसारित केले. याप्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. त्यानुसार पोलिसांनी क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायद्यानुसार कारवाई केली आहे. अटक केलेल्या आरोपींना त्यांनी ज्या परिसरात बेकायदेशीर जमाव जमवला होता, त्याच ठिकाणी नेऊन स्थानिक नागरिकांसमोर त्यांची धिंड काढली.

ओन्ली किंग ऑफ पुणे म्हणत सराईतासह टोळक्याने दुचाकीवर रॅली काढली. त्याचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. भविष्यात दहशत निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना आळा बसणार आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या सूचनेनुसार, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, उपनिरीक्षक राहुल कोळपे, महिला उपनिरीक्षक विशाखा म्हेत्रे, श्रीकांत शेंडे, दत्तात्रय खरपुडे, महेश नाणेकर, सुरेंद्र साबळे, साहेबराव गुंडाळे, श्रीकांत कोद्रे, विकास केदार, उज्ज्वल थोरात यांनी केली.

तडीपार असतानाही आरोपीने साथीदारांच्या मदतीने दुचाकीवर रॅली काढून व्हिडिओ व्हायरल केले होते. याप्रकरणी आम्ही तत्काळ कारवाई करीत संबंधित टोळीविरूद्ध कारवाई करीत अटक केली आहे.

संजय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पोलीस ठाणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×