राज्य गुप्त वार्ता विभागाकडून आदेश
marathinews24.com
पुणे – Rana Suryawanshi Security : बारामती परिसरात हल्ला झालेले उद्योजक राणा सूर्यवंशी यांना पुरविण्यात आलेली विशेष सुरक्षा (वाय प्लस) काढून घेण्याचे आदेश राज्य गुप्त वार्ता विभागाने (एसआयडी) दिले आहेत. याबाबत ‘एसआयडी’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी आदेश दिले आहेत. पुण्यातील मगरपट्टा भागात राहणारे उद्योजक राणा सूर्यवंशी यांना राज्य गुप्त वार्ता विभागाकडून विशेष सुरक्षा व्यवस्था (वाय प्लस) पुरविण्याबाबतचे आदेश १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दिले होते. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी बारामतीतील गोजुबावी भागात सायंकाळी सूर्यवंशी यांच्यावर दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी कोयत्याने वार करुन हल्ला केला होता.
दिवाळीला गावी चाललाय…फ्लॅटची सुरक्षितता वाढवा – सविस्तर बातमी
पुणे ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू केला. या प्रकरणी एका अल्पवयीनासह दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळावरीली सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तेव्हा सूर्यवंशी यांच्या बरोबर असलेले निकटवर्तीय चित्रीकरणात आढळून आले. त्यानंतर तीन निकटवर्तीय पसार झाले. अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.
राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी या प्रकरणाचा तपासाचा आढावा घेतला. राणा यांना पुरविण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेतील पुणे शहर पोलीस दलातील कर्मचारी वगळता अन्य जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी तैनात असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणाची चौकशी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक निखिल गुप्ता (कायदा आणि सुव्यवस्था) यांच्याकडे चौकशी सोपविण्यात आली आहे. राणा यांची शिपिंग कंपनी आहे, तसेच गडचिरोली त्यांचे काही व्यवसाय आहेत. यापूर्वी सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे हल्ला झाला होता. या पार्श्वभूमीवर त्यांना विशेष सुरक्षा पुरविण्यात आली होती.
राणा हे हडपसरमधील मगरपट्टा सिटी भागात वास्तव्यास आहे. यापूर्वी त्यांना देण्यात आलेली विशेष सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे. त्यांना आता एक बंदूकधारी पोलीस कर्मचाऱ्याचे संरक्षण (गनमॅन) देण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पुणे पोलिसांच्या विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. प्रशांत अमृतकर यांनी दिले आहेत.























