Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

पुण्यात रांका ज्वेलर्सला मॅनेजरनेच घातला १८ कोटींचा गंडा

पुण्यात रांका ज्वेलर्सला मॅनेजरनेच घातला १८ कोटींचा गंडा

मॅनेजरसह त्रिकुटाला बेड्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई

marathinews24.com

पुणे – लक्ष्मी रोडवरील रांका ज्वेलर्स सराफा व्यावसायिकाला तब्बल १८ कोटी रुपयांचा गंडा घालणार्‍या तिघांना खंडणी विरोधी पथकाने अहिल्यानगरातून अटक केले आहे. त्यांच्याकडून दागिने, आलिशान कार, ३ लाख ३० हजारांचे मोबाइल, ८० हजारांची रोकड मिळून ५ कोटी २४ लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. सराफा दुकानात ४२ वर्षांपासून काम करत असलेल्या मॅनेजरसह दोन साथीदारांच्या मदतीने १२ हजार ८०० ग्रॅम सोन्याचे दागिन्यांसह ७२ लाख लाख रूपये मिळून १८ कोटी ७२ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुण्यात मद्यधुंद वाहन चालकांविरूद्ध कारवाईचा बडगा – सविस्तर बातमी 

प्रशांत कांतीलाल बर्मेचा (वय ६१, रा. शांतीनगर सोसायटी, कोंढवा), रमाकांत महादेव पराळे (वय ६२, रा. केडगाव, जि. अहिल्यानगर) आणि मधु ऊर्फ महेश्वरी रमाकांत पराळे (वय २२, रा. केडगाव, जि. अहिल्यानगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत श्रेयस अशोक रांका (वय ३७, रा. अशोक बंगला, सुजय गार्डन, मुकुंदनगर) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दिली आहे. ही घटना १ ऑक्टोबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ कालावधीत घडली.

आरोपी प्रशांत बर्मेचा हा ४२ वर्षांपासून रांका ज्वेलर्स यांच्याकडे कामाला होता. १९९२ मध्ये त्यांनी लक्ष्मी रोडला दुकान सुरु केल्याने त्याची तेथे बदली केली. बर्मेचा अनुभवाने ज्येष्ठ असल्याने त्याला कंपनीने मॅनेजर आणि कॅशिअर म्हणून जबाबदारी दिली होती. त्याच्या कामावर विश्वास ठेवून कंपनीने प्रशांत बर्मेचा याला सोने पुरवठादार व ग्राहक यांच्याकडून सोन्याचे दागिने खरेदी विक्रीची जबाबदारी दिली होती. मार्च २०२६ मध्ये वार्षिक ऑडिट कामी स्टॉक व्हेरिफिकेशनमध्ये सोन्याच्या दागिन्यांमध्ये १२ हजार ८०० ग्रॅम वजनाचे दागिने व ७२ लाख रुपयांचा हिशोब लागला नाही. त्यावेळी दुकानातील बर्मेचा याने चोरी, फसवणूक व विश्वासघात केल्याचे स्पष्ट झाले.

अशी केली फसवणूक

सराफ दुकानात मागील ७ ते ८ महिन्यांपूर्वी कविता रमाकांत पराळे, तिची मुलगी मधु, पती रमाकांत पराळे हे दागिने खरेदी आले होते. त्यांची प्रशांत बर्मेचा याच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर ते वारंवार दुकानात खरेदीसाठी येऊ लागले. बर्मेचाने सोन्याचे दागिन्यांची विक्री न दाखवता जागड (अ‍ॅप्रुव्हल) तत्वावर संचालकांना कळू नये, यासाठी स्वत: परस्पर नोंदी केल्या. कविताला दुकानात, काही वेळा दुकानाच्या बाहेर गाडीत दागिने नेऊन दिले. बर्मेचाने १ ऑक्टोबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या दरम्यान १८ कोटी रुपयांचे तब्बल १३९ वेळा १२ हजार ८०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दिले. जानेवारी २०२६ मध्ये बर्मेचाने तिजोरीमधील ७२ लाख रुपये काढून शिपायाच्या हस्ते कारमध्ये बसलेल्या कविताजवळ दिले. दुकानात ऑडीटवेळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रांका यांनी २३ एप्रिलला फिर्याद दिली.

आरोपी हे अहिल्यानगरमधील केडगाव येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाला आरोपी प्रशांत बर्मेचा हा रमाकांत पराळे याच्या घरी मिळून आला. पराळेच्या घरझडती घेतली असता ३ कोटी ९० लाख ७२ हजारांचे ३ किलो ५५२ ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाईल, मोटार, रोकड, असा ५ कोटी २४ लाख ८२ हजारांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, एसीपी राजेंद्र मुळीक, पोलिस निरीक्षक राम राजमाने, एपीआय कल्याणी कसोदे, उपनिरीक्षक अभिजित पवार, अनिल कुसाळकर, किरण पड्याळ, अजिनाथ येडे, कानिफनाथ कारखेले यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×